ज्येष्ठ रेल्वे पेन्शनधारकांना घरपोच हयातीचा दाखला
पश्चिम रेल्वेचा उपक्रम; ८० वर्षांवरील १०० हून अधिक ज्येष्ठांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : वयोमानामुळे रेल्वे कार्यालय किंवा बँकेत जाऊन डिजिटल हयातीचा (जीवन प्रमाणपत्र) दाखला सादर करणे शक्य नसलेल्या ज्येष्ठ पेन्शनधारकांसाठी पश्चिम रेल्वेने घरपोच सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत ८० वर्षांवरील १०० हून अधिक ज्येष्ठांच्या घरी जाऊन हयातीचा दाखला तयार करण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या सहा विभाग आणि पाच कारखान्यांच्या माध्यमातून ६ नोव्हेंबरपर्यंत एकूण दोन हजार २३ डिजिटल हयातीचा दाखले जमा झाले आहेत.
ज्येष्ठांची गैरसोय टाळण्यासाठी ऑक्टोबरअखेरीस विशेष मोहीम राबविण्यात आली. पेन्शनधारक संघटनांच्या सहकार्याने पात्र पेन्शनधारकांचे पत्ते मिळवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी भेटी दिल्या. अंथरुणाला खिळलेले आणि शारीरिक अडचणींमुळे प्रवास करू न शकणाऱ्या ज्येष्ठांना या सुविधेचा विशेष लाभ झाला. याशिवाय चर्चगेट, विरार, वडोदरा, भावनगर आणि दाहोद येथे विशेष शिबिरेही घेण्यात आली.
पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करताना अडचण येऊ नये, यासाठी विभागीय कार्यालये, कारखाने आणि पेन्शनधारक संघटनांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.