बाधितांच्या पुनर्वसनासाठी पालिका सकारात्मक
मुंबई, ता. ७ : बोरिवली पूर्व येथील बेस्ट आगारालगत असलेल्या खासगी भूखंडावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे २७ रहिवासी व व्यावसायिक बाधित झाले असून, त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. रहिवाशांना ३०० चौरस फुटांचे घर आणि व्यावसायिकांना भाडे देण्याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.
बोरिवली येथील भाजपच्या शिष्टमंडळाने स्थानिक बाधित रहिवाशांच्या प्रश्नावर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची त्यांच्या दालनात नुकतीच माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. या बैठकीस महापालिका सभागृह नेते गणेश खणकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते. या वेळी महापालिका प्रशासन व विधी विभागाच्या कार्यवाहीतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. शासनाच्या नियमानुसार पात्र बाधित रहिवाशांना न्याय देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. तसेच संबंधित विकसकाने मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार बाधित रहिवाशांना भाडे द्यावे आणि त्यांना त्याच ठिकाणी ३०० चौरस फुटांचे घर उपलब्ध करून द्यावे, या मागणीबाबत प्रशासनाने सकारात्मक सहमती दर्शविली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.