मुंबई

नागरी प्रश्नांचे जातीयकरण थांबवा!

CD

नागरी प्रश्नांचे जातीयकरण थांबवा!
दिया मिर्झा यांच्या समर्थनार्थ ‘मुंबई फॉर पीस’चे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : अभिनेत्री दिया मिर्झा यांनी दिवाळीत प्रदूषणकारी फटाके न फोडण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ मुंबई महापालिकेच्या विनंतीवरून तयार केला होता. मात्र, त्यांच्या धार्मिक ओळखीवरून भाजप नेत्यांनी आक्षेप घेतल्याने राजकीय दबावाखाली हा व्हिडिओ महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ ‘मुंबई फॉर पीस’ या नागरिकांच्या व्यासपीठाने दिया मिर्झा यांना पाठिंबा देत नागरी आणि पर्यावरणविषयक प्रश्नांचे जातीयकरण थांबवण्याचे आवाहन केले आहे.
‘नफरत के खिलाफ, मोहब्बत के साथ’ हा संदेश देत मुंबई फॉर पीसने स्वच्छ हवा आणि ध्वनी प्रदूषणमुक्त वातावरणाचा हक्क प्रत्येक नागरिकास असल्याचे म्हटले आहे. संदेश देणाऱ्या व्यक्तीचा धर्म किंवा संबंधित सणाची धार्मिक पार्श्वभूमी यावरून त्याचे महत्त्व ठरवता येणार नाही. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सर्वांना प्रभावित करणाऱ्या नागरी प्रश्नांना धार्मिक रंग देणे योग्य नाही, असेही म्हटले आहे. त्याचबरोबर भाजप नेते अमित साटम आणि महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणाचे जातीयकरण केल्याचा आरोप करीत त्यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करताना दिया मिर्झा यांचा हटवलेला व्हिडिओ महापालिकेने पुन्हा प्रसारित करावा, अशी मागणी मुंबई फॉर पीसने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT