मुंबई

‘ऊर्जा अर्बप्रो’ बनावट; ‘एफडीए’ची घाेषणा

CD

‘ऊर्जा अर्बप्रो’ औषध बनावट
एफडीएचा धक्कादायक खुलासा; तपासणीत आढळले लैंगिक क्षमतेवरील औषध

मुंबई, ता. ८ : आरोग्यवर्धक कॅप्सूल म्हणून विक्री होणाऱ्या ऊर्जा अर्बप्रो या उत्पादनात लैंगिक दुर्बलतेवर वापरले जाणारे टाडालाफिल हे औषध आढळले आहे. उत्पादनातील घटकांच्या यादीत या औषधाचा उल्लेख नव्हता. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत प्रत्येक कॅप्सूलमध्ये ८.६७ मिलीग्रॅम टाडालाफिल आढळल्याने हे उत्पादन बनावट घोषित करण्यात आले आहे.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या सप्टेंबर २०२६ मधील गुणवत्ता अहवालानुसार, देशभरातील ३३० औषधांचे नमुने निकृष्ट दर्जाचे किंवा बनावट आढळले. त्यामध्ये महाराष्ट्रातील १८ नमुन्यांचा समावेश आहे. टाडालाफिल हे रक्तप्रवाह सुधारण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. त्याच्या सेवनामुळे डोकेदुखी, चक्कर, अपचन आणि पाठदुखी असे दुष्परिणाम होऊ शकतात. हृदयविकारासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रेट गटातील औषधांसोबत घेतल्यास रक्तदाब धोकादायकरीत्या कमी होऊ शकतो.
ऊर्जा अर्बप्रोच्या संबंधित तुकडीचा क्रमांक URJA702 असून, उत्पादन मे २०२६ मध्ये राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील अर्बोफोर्ट कंपनीने केले होते. त्याची अंतिम वापराची मुदत एप्रिल २०२९ आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० मधील कलम ३३-ईईए (डी) अंतर्गत हे उत्पादन बनावट घोषित करण्यात आले.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये उत्पादित ‘गोरी’ सौंदर्यप्रसाधनांच्या दोन नमुन्यांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा प्रचंड अधिक पारा आढळला. पहिल्या नमुन्यात ८९,७३३.०४ पीपीएम, तर दुसऱ्यात ४७,४७७.५३ पीपीएम पारा आढळला. याशिवाय हायड्रोक्विनोन आणि एका नमुन्यात मोमेटासोन फ्युरोएटही आढळले.

रक्तदाबावरील ‘ओसारस्मार्ट ४० ट्रायो’मध्ये औषधी घटकाचे प्रमाण ५१.८० टक्के, ‘ॲसेलिओ-प्लस’मध्ये ३२.३३ टक्के, तर फॅमोटिडीन ४० मिलीग्रॅम गोळ्यांमध्ये ७८.९८ टक्के आढळले. प्रतिजैविके, दम्यावरील औषधे, ॲस्पिरिन, जीवनसत्व ‘क’च्या गोळ्या आणि जंतुनाशक द्रावणांचे नमुनेही गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT