‘आयुष’ अभ्यासक्रमांच्या
८४.३० टक्के जागांवर प्रवेश
तिसरी फेरी पूर्ण; बुधवारी विशेष कॅप फेरी ४ची यादी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यातील आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) आणि बीयूएमएस (युनानी) या अभ्यासक्रमांच्या एकूण १३ हजार ७५० जागांपैकी ११ हजार ५९२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात ८४.३० टक्के जागा भरल्या असून, अद्याप दाेन हजार १५८ जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी विशेष कॅप फेरी चारसाठी विद्यार्थ्यांना साेमवारी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन पसंतीक्रम भरता येणार आहेत. या फेरीची प्रवेश यादी ११ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
राज्यातील १३९ आयुर्वेद महाविद्यालयांतील बीएएमएसच्या नऊ हजार ३०३ जागांपैकी आठ हजार १५२ जागा भरल्या आहेत, तर १,१५१ जागा रिक्त आहेत. यामध्ये २३ शासकीय महाविद्यालयांतील एक हजार ६७२ जागांपैकी एक हजार ५४७ जागांवर प्रवेश झाले आहेत. खासगी महाविद्यालयांतील सात हजार ६३१ जागांपैकी सहा हजार ६०५ जागा भरल्या आहेत.
बीएचएमएसच्या ५७ महाविद्यालयांतील चार हजार १९ जागांपैकी तीन हजार ४२ जागांवर प्रवेश झाले असून, ९७७ जागा रिक्त आहेत. बीयूएमएसच्या आठ महाविद्यालयांतील ४२८ जागांपैकी ३९८ जागा भरल्या असून, ३० जागा रिक्त आहेत. या अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयांतील १५३ पैकी १५२ जागांवर प्रवेश झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.