मुंबई

अपुऱ्या बस सेवांमुळे ‘बेस्ट’ प्रवाशांचे हाल

CD

अपुऱ्या बससेवांमुळे ‘बेस्ट’ प्रवाशांचे हाल
सणासुदीच्या दिवसांत गर्दी, विलंब

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांना आधुनिक आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा देण्यासाठी इलेक्ट्रिक बसगाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. नव्या बसगाड्या टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल केल्या जात आहेत. काही बस मार्गांत आवश्यक बदल केले आहेत; मात्र गर्दीच्या आणि सणासुदीच्या दिवसांत अपुऱ्या बससेवा आणि विलंबामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सकाळी कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळी कामावरून घरी परतताना बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढते. काही मार्गांवर बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना अर्धा-पाऊण तास थांबावे लागते. बस आली तरी ती आधीच भरलेली असल्याने अनेकदा प्रवाशांना पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कंत्राटधारांना ४,५०० इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले असताना ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत केवळ ७३६ बसगाड्यांचा पुरवठा झाला होता. यापैकी पहिल्या २,१०० बसच्या करारातील ६८६ आणि दुसऱ्या २,४०० बसच्या करारातील केवळ ५० बस दाखल झाल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बसगाड्या दाखल होण्याची प्रतीक्षा कायम आहे. बसची संख्या अपुरी असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
...
मार्गांमध्ये फेरबदल
बेस्टने गेल्या ५ ऑक्टोबरपासून १४ बसमार्गांमध्ये फेरबदल केले; मात्र मार्गांचे फेरबदल करताना प्रवाशांची प्रत्यक्ष गरज, लोकसंख्येची वाढ आणि रेल्वे स्थानकांपर्यंतची कनेक्टिव्हिटी यांचा पुरेसा विचार केला नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मात्र, नवीन बस सुरू करताना प्रवासीसंख्या आणि रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीचा विचार करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: बोलता बोलता आला हार्ट अटॅक; नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणांबद्दल महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा

Pune News: बहिणीला भाऊबीजेसाठी घरी आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात भावाचा मृत्यू, नुकताच विवाह अन्..

Shevgaon Paithan Highway Accident: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळाचा घाला; कानिफनाथांच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT