‘आयसीएसई’च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रातून दहावीचे ३१ हजार, तर बारावीचे चार हजार ६६० विद्यार्थी देणार परीक्षा
मुंबई, ता. ११ : कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट इक्झामिनिशनने (आयसीएसई) माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र, दहावी (आयसीएसई) आणि उच्च माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (आयएसई) बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी (११) जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही परीक्षेला एकूण ३,७९,९८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती ‘आयसीएसई’ने दिली. यात राज्यातून दहावीसाठी ३१,०३५ तर बारावीसाठी ४,६६० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
आयसीएसईची दहावीची परीक्षा भारतात तसेच परदेशात २,८३५ केंद्रांवर, तर आयएसईची बारावीची परीक्षा १,४७७ केंद्रांवर घेतली जाणार दहावीची परीक्षा ही एकूण ७६ विषयांसाठी तर बारावीच्या परीक्षेत ६० विषय असतील, अशी माहिती ‘आयसीएसई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंडळाचे सचिव डॉ. जोसेफ इमॅन्युएल यांनी दिली. या वेळात्रकानुसार सोमवारी, १५ फेब्रुवारी २०२७ रोजी दहावीची परीक्षा सुरू होऊन बुधवार, ३१ मार्च २०२७ रोजी संपणार आहे. भारतातील तसेच परदेशातील २,८३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे, तर या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी उत्तर प्रदेश (५१,१६८), पश्चिम बंगाल (४६,५२१), कर्नाटक (३३,४१७), महाराष्ट्र (३१,०३५), पंजाब (१९,३०८) आणि झारखंड (१७,२०१) या राज्यांमधून बसणार आहेत. बारावीची (आयएसई) परीक्षा मंगळवारी, ९ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होऊन गुरुवार, ८ एप्रिल २०२७ रोजी संपणार आहे. भारतातील तसेच परदेशातील १,४७७ परीक्षा केंद्रांवर १,६५१ संलग्न शाळांमधील एकूण १,१०,०२५ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी उत्तर प्रदेशातून सर्वाधिक ३४,७०२ विद्यार्थी बसणार आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल (३०,२३५), उत्तराखंड (५,६२९), पंजाब (५,४७९), झारखंड (५,३५६), महाराष्ट्र (४,६६०), तमिळनाडू (३,५७२), केरळ (३,४९१) आणि कर्नाटक (३,०१०) या राज्यांचा क्रमांक लागतो.
..
यंदाच्या परीक्षेत बदल
बारावीच्या परीक्षेच्या वेळांमध्ये यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आता प्रश्नपत्रिका वाचण्यासाठीचा वेळ सकाळी १० वाजता सुरू होईल, तर लेखनास सकाळी १०.१५ वाजता सुरुवात होईल. यामुळे परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सकाळी ९.४५ वाजता उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचनाची वेळ सकाळी १०.४५ आणि लेखनाची वेळ सकाळी ११ वाजता होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.