मुंबई

मदरशांत घुमणार महात्मा फुलेंचे विचार

CD

मदरशांत घुमणार महात्मा फुलेंचे विचार
‘गुलामगिरी’सह, ‘शेतकऱ्याचा आसूड’चा उर्दू अनुवाद


मुंबई, ता. ११ : थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्धी जयंतीनिमित्त (द्विजन्मशताब्दी) अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात महात्मा फुले यांच्या विचारांचा भाषिक विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत त्यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ या निवडक ग्रंथांचा उर्दू अनुवाद करून ते प्रकाशित करण्यात येणार आहेत. या कामासाठी अकादमीच्या २०२६-२७ या वर्षातील मंजूर सहायक अनुदानातून २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या रील्स आणि व्हिडिओ क्लिप तयार करून विभागाच्या संकेतस्थळावर तसेच समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतील मदरशांमध्ये ‘महात्मा फुले शैक्षणिक सप्ताह’ आयोजित केला जाणार आहे. या सप्ताहात विज्ञान, गणित आणि वाचन स्पर्धा घेण्यात येतील. यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, हा खर्च योजनेच्या २०२६-२७ या वर्षातील मंजूर निधीतील बचत किंवा पुनर्विनियोजनातून केला जाणार आहे. तसेच अल्पसंख्याक विद्यार्थी वसतिगृहांमध्ये ‘महात्मा फुले ग्रंथ कोपरा’ स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणी महात्मा फुले यांचे साहित्य मराठी, उर्दू आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. हा उपक्रम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांसाठी एकूण एक कोटी ११ लाख रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे. संबंधित उपक्रमांची अंमलबजावणी अल्पसंख्याक विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयांतील जिल्हा अल्पसंख्याक कक्ष, वसतिगृह अधीक्षक आणि महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान, महात्मा फुले यांची द्विशताब्धी जयंती ११ एप्रिल २०२७ रोजी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व मंत्रालयीन विभागांमार्फत विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


‘सत्यशोधक विचार’वर स्पर्धा
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘सत्यशोधक विचार’ या संकल्पनेवर आधारित निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या स्पर्धा होतील. स्पर्धेतील विजेत्यांना ११ एप्रिल २०२७ रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Fertilizer Subsidy Hike : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खतांच्या अनुदानात तब्बल ६४% वाढ, DAP ची गोणी कितीला मिळणार?

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

SCROLL FOR NEXT