मुंबई

पीएमजीपी वसाहत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभ्‍या राहणार १७ मजली इमारती

CD

पीएमजीपी वसाहत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभ्‍या राहणार १७ मजली इमारती
९८४ रहिवाशांना मिळणार ४४८ चौरस फुटांच्या सुसज्ज सदनिका; म्हाडाला ६०० घरे उपलब्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी वसाहतीचा म्हाडा समूह पुनर्विकास करणार आहे. त्यानुसार म्हाडाने येथेल सर्व १७ इमारती रिकाम्या करतानाच पाडकाम हाती घेतले आहे. दरम्यान, पाडकाम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याने चार-सहा महिन्यांत प्रत्यक्ष काम करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यानुसार येथे फनेल झोनमुळे इमारतींच्या उंचीवर मर्यादा असल्याने रहिवाशांसाठी १७ मजली सहा इमारती उभारल्या जाणार आहेत, तर दोन मजले बेसमेंट असणार आहेत, तर रहिवाशांना ४४८ चौरस फुटांच्या सुसज्ज सदनिका तयार केल्या जाणार आहेत, तर म्हाडाला सुमारे ६०० सदनिका उपलब्ध होऊ शकणार आहेत.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व येथील सुमारे सात एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या पूनमनगर परिसरातील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित होता. १९९० च्या दशकात उभारण्यात आलेल्या तळ अधिक चार मजल्यांच्या १७ इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत होत्या. यामध्ये १८० चौ फुटांच्या ९४२ निवासी सदनिका तसेच ४२ अनिवासी गाळ्यांचा समावेश आहे. रहिवाशांच्या मागणीनंतर आणि राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडाने हा पुनर्वसन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने संबंधित रहिवाशांना मासिक २० हजार रुपये भाडे किंवा संक्रमण सदिनकांचा पर्याय ठेवला होता, मात्र सुमारे २० रहिवाशांनीच संक्रमण सदिनकांचा पर्याय स्वीकारला असून, उर्वरित रहिवाशांनी भाड्याला पसंती दिल्याने त्यांना सुरुवातीला तीन महिन्यांचे आणि नंतर ३३ महिन्यांचे भाडे दिल्याची माहिती म्हाडाचे विशेष प्रकल्प कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता उर्वरित १० इमारतींचे पाडकाम वेगात सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार प्राधान्याने रहिवाशांकरिता १७ मजली सहा सुसज्ज इमारती उभारल्या जाणार आहेत.

असा असेल प्रकल्‍प
- सुमारे २७,६२५ चौ.मी. (७ एकर) क्षेत्रफळावर हा प्रकल्प उभारण्यात येणार.
- १,२१,८८९ चौरस मीटरचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ.
- एकूण बांधकाम क्षेत्रफळामध्ये ४५,७०८ चौ.मी. पुनर्वसन घटकासाठी, तर ७६,१८१ चौ.मी. विक्री घटकासाठी क्षेत्रफळ आहे.
- रहिवाशांना सध्या अस्तित्वात असलेल्या १८० चौरस फुटांच्या सदनिकांऐवजी ४५० चौरस फुटांच्या सुसज्ज सदनिका मिळणार.
- या प्रकल्पसाठी ८९३ कोटी रूपये एवढा खर्च अपेक्षित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना भाषा आडवी आली, ना अंतर! आफ्रिकेतील विद्यार्थ्यांनी सादर केला प्रतापगडाचा 'तो' ऐतिहासिक प्रसंग; VIDEO व्हायरल

Turkey Climate Summit : युरोपात उष्णतेची लाट, नेपाळमध्ये महापूर अन् जगासमोर ऊर्जा संकट; हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तुर्कीयेत जागतिक नेते एकवटले

Latest Marathi News Live Update : लोहारा येथे महिला घरात मृतावस्थेत आढळली; परिसरात हळहळ

उद्या मंगळाचं नक्षत्र परिवर्तन! ५ राशींचं नशीब पालटणार; आर्थिक परिस्थिती सुधारणार, करिअरमध्येही मोठी प्रगती

Yavatmal Student News : मुंबईतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, कुटुंबीयांचा दोन महिन्यांपासून पाठपुरावा; आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT