मुंबई

रसायनशास्त्रातील करिअरसाठी महिलांना ‘वी-केमिए’चे बळ

CD

मुंबई, ता. ११ : रसायनशास्त्र आणि रासायनिक उद्योग क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी बीएएसएफ इंडिया लिमिटेडच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘वी-केमिए’ या उपक्रमाला चांगले यश मिळत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत देशभरातील वंचित पार्श्वभूमीच्या २५०हून अधिक तरुणींना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी ८४ टक्क्यांहून अधिक जणींना नामांकित रासायनिक कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. रसायनशास्त्रातील पदवीधर तरुणींना कौशल्य, मार्गदर्शन आणि औद्योगिक अनुभव देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

बीएएसएफ इंडिया लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री पार्टनरशिप्स’मार्फत राबविला जातो. इंडियन केमिकल कौन्सिलचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. पारंपरिक वर्गाधारित शिक्षणापलीकडे जाऊन तांत्रिक ज्ञान, उद्योगक्षेत्राची माहिती, करिअर मार्गदर्शन, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध अंगांनी तरुणींना तयार केले जात असल्याची माहिती सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री पार्टनरशिप्सच्या संचालिका डॉ. अचला दनाईत यांनी दिली.

या प्रशिक्षणात रसायनशास्त्र विषयावरील व्याख्याने, औद्योगिक भेटी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आयटी कौशल्य प्रशिक्षण, स्वसंरक्षणाचे धडे, सांघिक उपक्रम आणि व्यावसायिक कार्यक्षमता विकासाचा समावेश आहे. बीएस्सी किंवा एमएस्सी रसायनशास्त्र तसेच संबंधित विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षातील किंवा पदवी पूर्ण केलेल्या तरुणींना या कार्यक्रमात सहभागी होता येते. मुंबई, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूर, दिल्ली, मंगळुरू, गोवा यांसह देशातील विविध शहरांतील तरुणींनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘दिवाळी बॅच’ला २० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

प्रशिक्षणातून घडले करिअर
उपक्रमाचा लाभ घेतलेल्या कोल्हापूरच्या प्रतीक्षा हिचे उदाहरण उल्लेखनीय आहे. कुटुंबाचे मासिक उत्पन्न सुमारे ३० हजार रुपये असलेल्या प्रतीक्षाला पदवी पूर्ण करूनही वर्षभर नोकरी मिळाली नव्हती. ‘वी-केमिए’मधील प्रत्यक्ष प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि औद्योगिक अनुभवामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. आज ती डाऊ इंडिया कंपनीत पुरवठा साखळी विभागात कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी संवाद साधण्याची जबाबदारीही सांभाळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Foreign Policy : हैदराबादमध्ये १३-१४ नोव्हेंबरला काँग्रेसची ‘भारत समिट’; ७० देशांतील एक हजार प्रतिनिधींसमोर राहुल गांधी मांडणार भारताच्या परराष्ट्र धोरणाचा दृष्टिकोन

Trump Immigration Policy : ट्रम्प यांची भूमिका अचानक बदलली! स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचे धोरण कठोर असल्याची कबुली; भारत-पाकिस्तान अणुयुद्धाबाबतही पुन्हा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : लोहारा येथे महिला घरात मृतावस्थेत आढळली; परिसरात हळहळ

Microsoft AI Policy : ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव, त्यातच मायक्रोसॉफ्टच्या धोरणांवर टीका; एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी त्रस्त?

Flight Hijack Scare : विमानाचे उड्डाण होणार इतक्यात टॉयलेटच्या आरशावर दिसला 'तो' मेसेज; १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला!

SCROLL FOR NEXT