मुंबई

सिंहगड संस्थेला दणका

CD

सिंहगड संस्थेला दणका
आर्थिक व्यवहारांचे चौकशी करण्‍याचे न्यायालयाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच निवृत्तिविषयक देणी आठ वर्षांपासून थकवणाऱ्या पुणेस्थित सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या (एसटीईएस) आर्थिक व्यवहारांची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले. संस्थेच्या ४४ शैक्षणिक संस्थांचे आर्थिक व्यवहार तपासण्याबरोबरच विश्वस्तांची मालमत्ता, बँक खाती आणि गुंतवणुका गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या विशेष खंडपीठाने संबंधित आदेश दिले. संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त मारुती नवले यांच्यासह आठ विश्वस्तांना अवमानप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तपास पूर्ण होईपर्यंत पुणे सोडण्यास मनाई केली आहे. त्यांना दर शुक्रवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यासह पारपत्रे तपास यंत्रणांकडे जमा करण्याचे आदेशही दिले, याप्रकरणी सुमारे २२० याचिका दाखल झाल्या असून, कर्मचाऱ्यांची ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक देणी थकीत आहेत. आर्थिक विवंचनेतून सुमारे १३ शिक्षकांनी आत्महत्या केल्याचा मुद्दाही न्यायालयात मांडण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थांच्या शाळांचा ताबा घेऊन शिक्षण सुरू ठेवण्याचे, तर तांत्रिक संस्थांचा ताबा प्रशासकाकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पैसा गेला कुठे?
संस्थेने ६ नोव्हेंबरला ६० कोटी ६५ लाख सहा हजार ४३६ रुपये दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन देऊनही एक रुपयाही दिला नाही. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे ५२ पानी आदेशात नमूद केले आहे. बँकेला दिलेली सहा पत्रे संशयास्पद असल्याचेही न्यायालयाने म्हटले. ४४ संस्था पूर्ण क्षमतेने सुरू असताना विद्यार्थ्यांकडून शुल्क जमा होऊनही कर्मचाऱ्यांचे वेतन का दिले नाही, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. निधीचा अन्य व्यवसायांसाठी अपहार झाल्याची शक्यता तसेच विश्वस्तांच्या मालमत्ता आणि प्राप्तिकर विवरणपत्रांतील विसंगतींचीही गंभीर दखल घेतली. खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवले.

अहवाल सादर करा!
शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. शिक्षणाचे व्यापारीकरण निरपराध कर्मचाऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली करून चालणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाने १९ नोव्हेंबरपर्यंत प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करावा, असेही आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fertilizer Subsidy Hike : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खतांच्या अनुदानात तब्बल ६४% वाढ, DAP ची गोणी कितीला मिळणार?

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

SCROLL FOR NEXT