मुंबई

बीकेसीतील एमएमआरडीएच्या निवासी भूखंडांना थंड प्रतिसाद

CD

बीकेसीतील एमएमआरडीएच्या निवासी भूखंडांना थंड प्रतिसाद
पाच महिन्यांनंतरही केवळ दोनच बोली; आठवडाभरात निविदा उघडणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांकरिता निधी उभारण्यासाठी एमएमआरडीए वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून बोली खुली ठेवली होती, मात्र निवासी बांधकामासाठी आरक्षित भूखंडांना अत्यंत थंड प्रतिसाद मिळाला असून, वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही गेल्या पाच महिन्यांत केवळ दोन निविदा आल्या आहेत. सदरच्या निविदा आठवडाभरात उघडण्यात येणार असल्याने सदरच्या भूखंडाच्या माध्यमातून किती निधी उभा राहणार याकडे एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एमएमआरडीएने ११ मे रोजी बीकेसीमध्ये नऊ भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्यासाठी खुले केले होते. यामध्ये चार निवासी आणि पाच व्यावसायिक कारणासाठी आरक्षित होते. वित्तीय संस्थांवरील अवलंबित्व कमी करून महसूल वाढवणे हा उद्देश होता. या नऊ भूखंडांचे एकत्रित क्षेत्र सुमारे ५३,४६१ चौरस मीटर (सुमारे १३ एकर) असून, सर्व नऊ भूखंडांमधून किमान ९,२८४.८८ कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी चार निवासी भूखंडांमधून किमान २,६६४.२५ कोटी रुपये अपेक्षित होते.

तीन वेळा मुदतवाढ
एमएमआरडीए प्राधिकरणाने बीकेसीमधील भूखंड भाडेतत्त्वावर देण्यासाठी मे महिन्यात निविदा काढली होती. त्यानुसार सुरुवातीला २४ जुलै ही अंतिम मुदत होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ती वाढवून २१ ऑगस्ट, २१ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर करण्यात आली होती. त्यामुळे आता आठवडाभरात निविदा उघडल्या जाणार असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.
- बँक ऑफ बडोदा आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी). या दोन्ही संस्थांनी निवासी भूखंडासाठी निविदा भरल्या आहेत. त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनासाठी निवासस्थाने विकसित करण्याचे त्यांचे नियोजन आहे. दरम्यान, त्यांनी किती रकमेच्या निविदा भरल्या आहेत हे आर्थिक निविदा उघडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. यापूर्वी एमएमआरडीएने चारपैकी तीन निवासी भूखंड भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रयत्न केला होता, पण एकही बोलीदार आला नाही.

प्रति चौरस मीटरसाठी तीन लाख ५२ हजार रुपये भाडे
एमएमआरडीएने निवासी भूखंडांसाठी ३,५२,००८ रुपये प्रति चौरस मीटर एवढा किमान भाडेपट्टा निश्चित केला आहे. त्यापेक्षा अधिक बोली लावणाऱ्याना भूखंड वितरित केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी बिल्डर जितेंद्र मेहता यांची दीड तास चौकशी

SCROLL FOR NEXT