मुंबई

आयुष्मान कार्ड नोंदणीत मुंबईची पिछाडी

CD

आयुष्मान कार्ड नोंदणीत मुंबईची पिछाडी
पहिल्या ३३ दिवसांत केवळ ३९ हजार कार्डांची निर्मिती; अनेक विभागांत उद्दिष्टपूर्ती एक टक्क्यापेक्षा कमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पात्र नागरिकांना आरोग्य विमा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या १०० दिवसांच्या आयुष्मान कार्ड मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
मोहिमेच्या पहिल्या ३३ दिवसांत मुंबईत ३९ हजार ३२ आरोग्य कार्ड तयार करण्यात आली आहेत, मात्र अनेक विभागांमध्ये उद्दिष्टपूर्ती एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. मरीन लाइन्स-काळबादेवी येथील सी विभागाने १०४.७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असताना मालाड-मालवणी, गोवंडी-मानखुर्द आणि कुर्ला-चांदिवली परिसरात नोंदणीचा वेग अत्यंत मंदावला आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत मोहिमेला गती देण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.
मुंबई महापालिकेच्या मुंबई डिजीहेल्थ कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ २ ऑक्टोबर २०२६ रोजी झाला. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतच्या रुग्णालयीन उपचारांचा खर्च रोखरहित पद्धतीने उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम जानेवारी २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे.
पालिकेच्या ३ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पहिल्या ३३ दिवसांत दररोज सरासरी एक हजार १८३ कार्ड तयार झाली. विभाग क्रमांक २ मध्ये सर्वाधिक १० हजार ९२७, विभाग क्रमांक ६ मध्ये आठ हजार ६७६, तर विभाग क्रमांक ३ मध्ये सहा हजार ३३३ कार्ड तयार करण्यात आली. विभाग क्रमांक ५ मध्ये सर्वांत कमी एक हजार ४८१ कार्ड तयार झाली. प्रभागनिहाय आकडेवारीत भांडुप-कांजूरमार्ग येथील एस विभाग सहा हजार ३३५ कार्डांसह आघाडीवर असून, वरळी-लोअर परळ येथील जी/दक्षिण विभागात पाच हजार ३९६ कार्ड तयार झाली आहेत.
उद्दिष्टपूर्तीच्या बाबतीत सी विभागाने एक हजार सात कार्ड तयार करून १०४.७ टक्के उद्दिष्ट ओलांडले, मात्र पी/उत्तर विभागात (मालाड-मालवणी) केवळ ६२ कार्ड तयार झाली असून, उद्दिष्टपूर्ती शून्य टक्के आहे. एम/पश्चिम (चेंबूर-टिळकनगर) आणि एम/पूर्व (गोवंडी-मानखुर्द) विभागांत प्रत्येकी ०.४ टक्के, तर एल विभागात (कुर्ला-चांदिवली) अवघी ०.३ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे.
दरम्यान, ३० ऑक्टोबर हा मोहिमेतील सर्वाधिक कामकाजाचा दिवस ठरला. या दिवशी दोन हजार ५८० कार्ड तयार करण्यात आली, तर एक हजार ८८७ कार्डांचे वितरण झाले.

कुठे करता येणार नोंदणी?
नोंदणीसाठी पालिकेने रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना केंद्रे, विभागीय कार्यालये आणि रेशन दुकानांमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. आशा सेविका आणि समुदाय आरोग्य स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेशन कार्ड आणि ई-केवायसी पडताळणीद्वारे नोंदणी पूर्ण केली जात आहे.

पालिकेचे म्‍हणणे काय?
पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मोहिमेचे अद्याप जवळपास दोन तृतीयांश दिवस शिल्लक आहेत. कमी प्रतिसाद असलेल्या विभागांत जनजागृती वाढवून नोंदणीला गती देण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीत विशेषतः उपनगरांतील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचण्यात पालिकेला कितपत यश मिळते, यावर मोहिमेचे यश अवलंबून राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, अटल सेतू-एक्स्प्रेसदरम्यानचे ६७ टक्के काम पूर्ण

India Inflation: भारतात महागाईचा कहर, ऑक्टोबर मध्ये गाठला दोन वर्षातील उच्चांक; दर RBI च्या मर्यादेपलीकडे

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग! आज महत्त्वाच्या घडामोडी

Winter Special Broccoli Soup: थंडीच्या दिवसांत शरीराला द्या पोषणाची साथ! बनवा गरमागरम ब्रोकली सूप आणि क्रीमी टोस्ट

SCROLL FOR NEXT