स्मार्ट कार्डच्या सक्तीचा एसटीला फटका!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा तोटा ऑक्टोबर महिन्यात २४० कोटी रुपयांहून अधिक झाला असून, सप्टेंबरच्या तुलनेत त्यात १५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एसटीचा दररोजचा तोटा सात कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डची घाईघाईने लागू केलेली सक्ती आणि व्यवस्थापनाचे नियोजनशून्य निर्णय यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आली, मात्र कार्डची उपलब्धता आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच हा निर्णय लागू करण्यात आला. राज्यातील केवळ ४३ टक्के महिला प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड असताना सक्ती केल्याने उर्वरित महिलांना प्रवासात अडचणी आल्या. त्यामुळे महिला प्रवाशांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनीही एसटीकडे पाठ फिरवल्याचा दावा बरगे यांनी केला आहे. महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या धोरणात्मक निर्णयांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई का केली जात नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.