मुंबई

कांजूरमार्ग आगीमागे रिव्हर्स करंटचा संशय!

CD

कांजूरमार्ग आगीमागे रिव्हर्स करंटचा संशय!
उपकरणांचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातील रिले कक्षाला लागलेल्या आगीमागे विजेचा प्रवाह उलट्या दिशेने गेल्याचे (रिव्हर्स करंट) कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विजेचा प्रवाह उलट्या दिशेने गेल्याने सिग्नल यंत्रणेतील उपकरणांमध्ये बिघाड होऊन त्यांचा स्फोट झाला असावा, असा रेल्वेचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सिग्नल यंत्रणेतील उपकरणांची जागा बदलण्याचे नियोजन रेल्वे प्रशासन करीत आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. कांजूरमार्ग स्थानक परिसरातील रिले कक्षाला २६ ऑक्टोबरला आग लागली होती. या आगीत सिग्नल यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. तब्बल २४ सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक नऊ तासांहून अधिक काळ विस्कळित झाली होती. रेल्वे रूळ ओलांडताना तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सध्या सिग्नल यंत्रणेतील उपकरणे केबलच्या जवळ आहेत. त्यामुळे उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण सिग्नल यंत्रणेवर होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी ही उपकरणे केबलपासून दूर सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे भविष्यात अशी घटना घडल्यास नुकसान कमी होईल आणि दुरुस्तीचे कामही लवकर करता येईल.
...
चौकशी अहवालाची प्रतीक्षा
घटनेला पंधरवडा उलटूनही आगीचे अधिकृत कारण समोर आलेले नाही. तसेच या घटनेला जबाबदार कोण, याबाबतही स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे चौकशी अहवाल कधी येणार आणि दोषींवर काय कारवाई होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

IRCTC Shimla-Manali Winter Special Tour Package : नोव्हेंबरच्या अखेरीस शिमला-मनाली फिरण्याची सुवर्णसंधी; IRCTC कडून 'विंटर स्पेशल टूर पॅकेज' जाहीर, टॉय ट्रेनचा प्रवास ते विमानाची सुविधा एकाच पॅकेजमध्ये

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता सतेज पाटलांनी फेटाळली; "मला १०० टक्के खात्री आहे, विलीनीकरण होणार नाही"

SCROLL FOR NEXT