मुंबई

सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांची नियुक्ती ऑनलाइन समुपदेशनाद्वारे

CD

सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांची नियुक्ती ऑनलाइन समुपदेशनाद्वारे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये बॉण्ड सेवेंतर्गत वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या नियुक्त्यांमध्ये आता रुग्णालयांची मनमानी चालणार नाही. राज्यातील सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदांचे वाटप केंद्रीकृत ऑनलाइन समुपदेशन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत.
यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग लवकरच सर्व रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना रिक्त पदांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देणार आहे. या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नियुक्ती मिळालेल्या डॉक्टरांनाच विद्यावेतन दिले जाणार आहे. संस्था स्तरावर थेट नियुक्त्या केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारी महाराष्ट्र वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटनेच्या (एमएसआरडीए) प्रतिनिधी मंडळाने मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांची भेट घेऊन हिवाळी २०२६ च्या बॉण्ड सेवा पदवाटप प्रक्रियेशी संबंधित विविध समस्या मांडल्या. या बैठकीत मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील उपलब्ध बॉण्ड सेवेची पदेही केंद्रीकृत ऑनलाइन समुपदेशन प्रक्रियेत समाविष्ट करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली. यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांसमोर प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. आतापर्यंत अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित न झालेली रिक्त पदेही लवकरच समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. एमएसआरडीएचे अध्यक्ष डॉ. सुयश धवने यांनी सांगितले की, बॉण्ड सेवेचा मुख्य उद्देश रुग्णांची सेवा करण्याबरोबरच नवोदित डॉक्टरांचे वैद्यकीय कौशल्य आणि विशेष उपचारांमधील अनुभव विकसित करणे हा आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होण्यासाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
...
स्वतंत्र फेरी
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांसाठी स्वतंत्र विशेष समुपदेशन फेरी आयोजित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT