मुंबई

सीएसएमटीनंतर आता ठाणे, कल्याण स्थानकांवर स्वच्छतागृहे चकाचक!

CD

रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहे चकाचक
डीमार्ट फाउंडेशनकडून कल्याण, ठाण्यात नूतनीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावरील यशस्वी उपक्रमानंतर आता मध्य रेल्वेने ठाणे आणि कल्याण स्थानकांवरील प्रसाधनगृहांचे नूतनीकरण केले आहे. डीमार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिला आणि पुरुष प्रवाशांना अधिक स्वच्छ व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रसाधनगृहांची पुढील पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी डीमार्ट फाउंडेशनने स्वीकारली आहे.
ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वर महिलांसाठी प्रसाधनगृह आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबरपासून ही सुविधा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. महिलांच्या प्रसाधनगृहात चार युनिट असून, त्यामध्ये तीन भारतीय आणि एक पाश्चात्त्य पद्धतीचे प्रसाधनगृह आहे. दिव्यांगांसाठीही स्वतंत्र सुविधा आहे. पुरुषांच्या विभागात ११ मूत्रालये आणि तीन प्रसाधनगृहे आहेत. दुर्गंधी रोखण्यासाठी हवा खेळती ठेवणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सहा कर्मचारी १४ तास तैनात असणार आहेत.
--------------
कल्याणमध्ये १९ कर्मचाऱ्यांकडून देखभाल
कल्याण स्थानकावरील फलाट क्रमांक २/३ आणि ६/७ येथील प्रसाधनगृहांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. २८ ऑगस्टपासून ही प्रसाधनगृहे प्रवाशांसाठी खुली झाली आहेत. महिलांच्या विभागात नऊ प्रसाधनगृहे, तर पुरुषांच्या विभागात नऊ मूत्रालये आणि चार भारतीय पद्धतीची प्रसाधनगृहे आहेत. दिव्यांग प्रवाशांसाठीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या स्वच्छतेसाठी एकूण १९ कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत.
------------
प्रवाशांना विनामूल्य सुविधा
प्रवाशांना या प्रसाधनगृहांचा वापर विनामूल्य करता येणार आहे. डीमार्ट फाउंडेशनकडून दोन्ही स्थानकांवर स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यापूर्वी सीएसएमटी, भायखळा आणि घाटकोपर स्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या देखभालीसाठीही मध्य रेल्वेने डीमार्ट फाउंडेशनसोबत सहकार्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

SCROLL FOR NEXT