पश्चिम रेल्वेच्या आठ विशेष गाड्या
उत्तर प्रदेश, बिहारसाठी फेऱ्या; गर्दी कमी होण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने आठ एकेरी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे टर्मिनस, वलसाड, उधना, प्रतापनगर आणि अहमदाबाद येथून १५ आणि १६ नोव्हेंबरला या गाड्या सुटणार आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विविध शहरांसाठी या विशेष गाड्या धावणार असल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या गाड्यांमध्ये वांद्रे टर्मिनस-गोरखपूर, वलसाड-राजगीर, वलसाड-समस्तीपूर, उधना-गया, उधना-बरौनी, उधना-झंझारपूर, प्रतापनगर-रक्सौल आणि अहमदाबाद-मधुबनी या मार्गांचा समावेश आहे.
०९११३ वांद्रे टर्मिनस-गोरखपूर विशेष १५ नोव्हेंबरला पहाटे ४.३० वाजता सुटेल. ०९०६३ वलसाड-राजगीर विशेष त्याच दिवशी सकाळी ८.४५ वाजता सुटेल. ०९०६७ वलसाड-समस्तीपूर विशेष रात्री १०.२० वाजता सुटणार असून, ०९०८१ उधना-गया विशेष १५ नोव्हेंबरला रात्री ७.४५ वाजता निघेल, तर ०९०८९ उधना-बरौनी विशेष रात्री ९.४५ वाजता सुटेल. दुसरीकडे ०९०६१ उधना-झंझारपूर विशेष १६ नोव्हेंबरला रात्री ९.४५ वाजता सुटेल. ०९१३३ प्रतापनगर-रक्सौल विशेष १६ नोव्हेंबरला रात्री ११.५० वाजता सुटेल तर, ०९४३१ अहमदाबाद-मधुबनी विशेष १५ नोव्हेंबरला सकाळी १०.१० वाजता सुटून १७ नोव्हेंबरला पहाटे १.४० वाजता मधुबनी येथे पोहोचेल. या सर्व गाड्यांना शयनयान आणि द्वितीय श्रेणी सामान्य डबे असतील. यासाठी विशेष भाडे आकारण्यात येणार असून, आरक्षणाला सुरुवात झाली आहे. प्रवाशांना सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकिटे आरक्षित करता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.