मुंबई

मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांतच विसर्जन कुंड

CD

गृहनिर्माण प्रकल्पांतच विसर्जन कुंड

मुंबईच्या विकास आराखड्यासंदर्भात पेडणेकरांची सूचना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : दरवर्षी गणेशाेत्सवादरम्यान लाखाे घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. या मूर्तींच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्‍यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात येते. या पार्श्वभूमीवर मुंबईत उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांतच ‘विसर्जन कुंड’ तयार करण्यात यावेत, अशी मागणी मुंबई महापालिकेच्या विराेधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार मुंबईच्या विकास आराखड्यात तरतूद करून प्रोत्साहन नियमावली करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

दरवर्षी मुंबई शहरात लाखो घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते; मात्र वाढते नागरीकरण, लोकसंख्येची घनता आणि घरगुती गणेशमूर्तींच्या संख्येत होणारी वाढ यामु‌ळे गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मुंबईतील समुद्रकिनारे, नैसर्गिक तलाव व अन्य जलस्रोतांवर ताण निर्माण होतो. तसेच पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेला प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी केली. दरवर्षी अशा तलावांची उभारणी करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या गृहसंकुले, पुनर्विकास प्रकल्प तसेच मोठ्या गृहनिर्माण योजनांना मंजुरी देताना संबंधित विकसकांनी विसर्जनासाठी त्यांच्या भूखंडाच्या परिसरात कृत्रिम तलाव अथवा विसर्जन कुंड निर्माण करण्यासंदर्भात नवीन बांधकाम प्रकल्पांच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत आवश्यक तरतूद करावी. तसेच कृत्रिम तलावाचे आराखडे, आकारमान, बांधकामाची रचना, पाणी साठवण क्षमता व पर्यावरणविषयक तांत्रिक निकष निश्चित करण्यात यावेत, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे. सुविधा बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र अथवा भोगवटा प्रमाणपत्र देताना निर्धारित अटींच्या अधीन राहून ते उपलब्ध करून देणे बंधनकारक करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kartiki Ekadashi 2026 : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरच्या विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; 'या' वेळेस फक्त काही मिनिटेच मिळणार दर्शन!

New Orleans Ship Crash : मिसिसिपी नदीत क्रूझ बोटीला महाकाय टँकरची भीषण धडक! अवघ्या १५ मिनिटांत बोट उलटली; १२९ प्रवाशांचे पुढे काय झाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

SCROLL FOR NEXT