मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

CD

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव
वीजनिर्मितीसह बाष्पीभवन रोखून पाण्याचीही होणार बचत; महासभेत ठरावाची सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणे आणि जलाशयांच्या पृष्ठभागावर तरंगते सौरऊर्जा पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मांडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे एकीकडे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती होईल, तर दुसरीकडे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जलसाठ्यांचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे. नगरसेवक सचिन देवदास पडवळ यांनी यासंदर्भात महापौरांकडे ठरावाची सूचना सादर केली आहे.
मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेची उपलब्धता हा प्रमुख अडथळा आहे. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचा उपयोग करून सौरऊर्जानिर्मिती करण्याचा पर्याय पुढे आला आहे. तरंगते सौरऊर्जा पॅनेल विशेष संरचनेच्या सहाय्याने जलाशयांच्या पृष्ठभागावर बसविण्यात येतात. या पॅनेलमुळे पाण्यावर सावली निर्माण होत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी, जलसाठ्यांचे संरक्षण आणि वीजनिर्मिती असे दुहेरी उद्दिष्ट साध्य होऊ शकते.
महापालिकेच्या अखत्यारीतील धरणे, जलाशये आणि पाणीसाठ्यांचा शास्त्रीय अभ्यास करून तेथे अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याची शक्यता तपासावी, अशी मागणी पडवळ यांनी केली आहे. प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर योग्य ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारावा. त्यानंतर त्याचा विस्तार अन्य जलाशयांमध्ये टप्प्याटप्प्याने करावा, असे सूचनेत नमूद केले आहे.

वीजखर्चात बचत
या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीजखर्चात बचत होण्यासोबतच पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. या ठरावाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करावा, अशी विनंतीही ठरावाच्या सूचनेत करण्यात आली आहे.महापालिकेच्या आगामी सभेत हा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

MPSC Scam: आयोगाचे दोन सदस्य चौकशी समितीच्या रडार वर? तुकाराम मुंढे काय कारवाई करणार?

राज ठाकरेंची मोठी खेळी! बड्या नेत्यांसह ३५० कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश, एकनाथ शिंदेंसह छावा संघटनेला धक्का

Latest Marathi News Update : भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बोलावली बैठक, मुंबईतील विविध विषयांवर होणार चर्चा

Kulgam Encounter: कुलगाम हल्ल्याचा बदला! लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी ठार; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT