मुंबई

बालशोषणाचे वाढते संकट

CD

मुंबई, ता. १८ : निरागस बालपणावर अत्याचारांचे सावट अधिक गडद होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्रात बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, ही बाब चिंतेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) ‘क्राइम इन इंडिया २०२४’ अहवालानुसार, राज्यात पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदविल्या जाणाऱ्या गुन्ह्यांत ९.२ टक्क्यांनी वाढ झाली असून, बालकांचे संरक्षण आणि लैंगिक शोषणाविरोधात जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

२०२३ मध्ये ८,६३९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ९,४३२ वर पोहोचली. यामध्ये मुंबईतील १,४१६ प्रकरणांचा समावेश असून, त्यापैकी ६६० प्रकरणे बलात्काराशी संबंधित आहेत. या पार्श्वभूमीवर बाल लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘अर्पण’ या स्वयंसेवी संस्थेने १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी ‘बाल सुरक्षा सप्ताह २०२६’ मोहीम सुरू केली आहे.

मोहिमेला अभिनेत्री आणि अर्पण संस्थेच्या सदिच्छादूत विद्या बालन यांनी पाठिंबा दिला आहे. यंदा ‘रुक जाओ वरना पॉक्सो पकडलेगा’ या घोषवाक्याखाली मोहीम राबविण्यात येत आहे. मुलांना अनुचित स्पर्श करणे, अश्लील साहित्य दाखविणे, तसेच मुलांचे अश्लील फोटो किंवा व्हिडिओ काढणे, डाउनलोड करणे, जवळ बाळगणे अथवा प्रसारित करणे, हे पॉक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हे असल्याबाबत जनजागृती केली जात आहे.

शाळांमध्ये जनजागृतीपर पोस्टर्स
मोहिमेच्या प्रसारासाठी ‘अर्पण’ने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी भागीदारी केली आहे. देशभरातील शाळांमध्ये जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात येत आहेत. मुंबई महानगर प्रदेशात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील डिजिटल फलक, निवासी सोसायट्यांमधील १,७००हून अधिक स्क्रीन, मेट्रो मार्ग २ ए आणि ७ तसेच बेस्ट, टीएमटी आणि एनएमएमटीच्या १,९०० हून अधिक बसमधून बालसुरक्षेचा संदेश दिला जाणार आहे.

बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी केवळ कायद्याची माहिती देणे पुरेसे नाही. समाजातील प्रत्येकाने जागरूक राहून वेळीच हस्तक्षेप करणे आणि जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालक, शिक्षक आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
- पूजा तापडिया, अर्पण संस्थेच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

Devuthani Ekadashi Do's & Don'ts: देवउठणी एकादशीला चुकूनही करू नका 'या' ६ चुका; व्रत करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम!

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

SCROLL FOR NEXT