मुंबईत हरित इमारती व नेट झीरो शहरे परिषदेचे आयोजन
मुंबई, ता. १६ : ‘सीआयआय’ आणि इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल तर्फे २४ वी ग्रीन बिल्डिंग काँग्रेस २०२६ ही परिषद मुंबईत २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक बांधकाम क्षेत्राचा देशाचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी या वेळी विचारमंथन करण्यात येणार आहे. या परिषदेत तीन हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी, १० हजार व्यावसायिक पाहुणे, दीडशे विचारवंत आणि शंभर संस्थात्मक आणि औद्योगिक भागीदार सहभागी होतील. प्रदूषणमुक्तीच्या देशाच्या भवितव्याला चालना देण्यासाठी नेट झीरो इमारती, शाश्वत शहरे, ऊर्जा सुरक्षा, हवामान लवचिकता आणि आधुनिक प्रकारचे हरित बांधकाम तंत्रज्ञान यावर या परिषदेत भर दिला जाईल, अशी माहिती सीआयआय इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. शेखर रेड्डी यांनी सोमवारी (ता. १६) दिली.
भारतात सध्या १६.५५ अब्ज चौरस फुटांचे २० हजारांहून जास्त नोंदणीकृत प्रकल्प आहेत. त्यामुळे भारताने जगातील दुसरी सर्वांत मोठी हरित इमारत बाजारपेठ म्हणून आपले स्थान पक्के केले असल्याचे सी. शेखर रेड्डी यांनी सांगितले. ‘आयजीबीसी’ मानांकित इमारतींमुळे दरवर्षी सुमारे ६४ अब्ज युनिट वीज आणि १९९ अब्ज लिटर पाण्याची बचत होते तर ५३.५ कोटी टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टाळले जाते. त्यामुळे हरित इमारतीत निरोगी राहणीमान, आवश्यक संसाधनांची उपलब्धता असे फायदे समाजाला होतात. त्यामुळे पुढील टप्प्यात वैयक्तिक हरित इमारतींच्या पुढे जाऊन नेट झीरो इमारती, संकुले, टाऊनशिप आणि शाश्वत शहरे उभारण्यावर भर दिला पाहिजे, असेही रेड्डी म्हणाले. झीरो मिशनमध्ये नेट झीरो एनर्जी, नेट झीरो वॉटर, नेट झीरो वेस्ट आणि नेट झीरो कार्बन यांचा समावेश आहे, असे कौन्सिलचे कार्यकारी संचालक एम. आनंद म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.