तिकीट कन्फर्म; पण आसन गायब!
रेल्वेचा अजब कारभार; ज्येष्ठ नागरिकाची फरफट
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : रेल्वेच्या आरक्षण व्यवस्थेतील सावळागोंधळाचा प्रकार समोर आला आहे. प्रवाशाला आरक्षित तिकिटावर आसन क्रमांक ७३ देण्यात आला; मात्र प्रत्यक्ष गाडीत या क्रमांकाचे आसनच नसल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला रात्रीच्या प्रवासात मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, संबंधित डब्यात आसन क्रमांकाची मालिकाच अपूर्ण असल्याचेही निदर्शनास आले. यामुळे आरक्षण व्यवस्थेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डोंबिवली पूर्व येथील राजेंद्र हिराबाई जोमाजी पाटील यांनी शुक्रवारी (ता. १३) सोलापूर ते कल्याण असा हॉस्पेट-मुंबई एक्स्प्रेसने प्रवास केला. त्यांच्या आरक्षित तिकिटावर आसन क्रमांक ७३ नमूद होता, मात्र त्या क्रमांकाचे आसन आढळले नाही. त्यामुळे आरक्षण करूनही त्यांना निश्चित केलेल्या आसनाचा लाभ घेता आला नाही. गाडी क्रमांक १११४० च्या सी-१ कोचमध्ये एक ते पाच या आसन क्रमांकांच्या मालिकेत तीन क्रमांकाचे आसनच नसल्याचे निदर्शनास आले. तसेच सी-२ कोचमध्येही ७३ क्रमांकाचे आसन अस्तित्वात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
...
रेल्वेचे स्पष्टीकरण
गाड्यांचे कोच काही वेळा ऐनवेळी बदलावे लागतात. त्यामुळे तिकिटावर नमूद केलेले आसन क्रमांक आणि प्रत्यक्ष कोचमधील आसन क्रमांक यांच्यात तफावत दिसून येऊ शकते. अशा परिस्थितीत प्रवाशांना पर्यायी आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टीसीची असते. संबंधित प्रवाशाला अन्य आसनावर समायोजित करण्यात आले, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.
...
टीसीसाठी दीड तास प्रतीक्षा!
‘‘सोलापूरहून गाडी सुटल्यानंतर कुर्डुवाडी स्थानक ओलांडूनही टीसी डब्यात फिरकला नाही. मी स्वतः वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना फोन करून तिकीट पाठवले आणि नियंत्रण कक्षातून निरोप गेल्यानंतर तब्बल दीड तासाने टीसी आला. एखाद्या सामान्य प्रवाशाची अशी ओळख नसेल, तर त्याने पुढील स्थानक येईपर्यंत ताटकळत उभे राहायचे का? आसन बदलाची माहिती प्रवाशांना संदेशाद्वारे का दिली जात नाही? प्रवाशांना पूर्वसूचना देणे आणि पर्यायी आसन उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे, असे उपनगरीय प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.