मुंबई

पथदिव्यांच्या वीजबिलांसाठी ५५ कोटींची जुळवाजुळव!

CD

पथदिव्यांच्या वीजबिलांसाठी ५५ कोटींची जुळवाजुळव!
अर्थसंकल्पीय तरतूद अपुरी; १५ विभागांच्या निधीतून ५४.८० कोटी वर्ग करण्याचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईतील रस्ते, उड्डाणपूल आणि पुलांवरील पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाला तब्बल ५४.८० कोटी रुपयांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. अर्थसंकल्पात वीजखर्चासाठी केलेली तरतूद अपुरी पडल्याने अन्य विभागांच्या बजेटमधून हा निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. सुमारे १५ विभागांच्या निधीतून रक्कम वळविण्यात येणार असून, येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागांतर्गत विविध रस्ते, उड्डाणपूल आणि पुलांवरील पथदिव्यांची वीजबिले तसेच त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च केला जातो. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या खर्चासाठी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) विभागाच्या विद्युत खर्चाच्या लेखाशीर्षाखाली निधीची तरतूद करण्यात आली होती, मात्र नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील वीजबिलांची देयके प्रलंबित राहिल्याने अतिरिक्त निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, पथदिव्यांच्या वीजपुरवठा आणि देखभालीसाठी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या दरांमध्ये त्यानंतर सुधारणा करण्यात आली. नव्या दरांमुळे खर्चात वाढ झाली असून, त्याचा आर्थिक भार महापालिकेच्या तिजोरीवर पडत आहे. परिणामी, उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद अपुरी ठरली आहे.
आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये रस्ते व वाहतूक विभागाच्या विद्युत खर्चासाठी २२०.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली, तरी मागील कालावधीतील प्रलंबित देयकांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे विविध विभागांच्या कॉस्ट सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या निधीतून ५४.८० कोटी रुपये विद्युत खर्चाच्या लेखाशीर्षावर वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्‍ह
मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील कलम १३३ (अ) नुसार या निधी हस्तांतरणासाठी स्थायी समिती आणि महापालिकेची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या बैठकीत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. पथदिव्यांची वीजबिले भरण्यासाठी अन्य विभागांच्या निधीवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने महापालिकेच्या आर्थिक नियोजनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT