मुंबई

मुंबई-बंगळूर वंदे भारतमध्ये पुरणपोळी?

CD

मुंबई-बंगळूर वंदे भारतमध्ये पुरणपोळी?
आयआरसीटीसीचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीची चव चाखता येण्याची शक्यता आहे. या गाडीच्या खाद्यपदार्थांच्या यादीत महाराष्ट्राची पारंपरिक पुरणपोळी समाविष्ट करण्याचा विचार भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाकडून (आयआरसीटीसी) सुरू आहे. त्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झालेल्या या गाडीच्या खाद्यपदार्थांच्या यादीत सध्या दक्षिण भारतीय पदार्थांना प्राधान्य आहे. बंगळूरहून गाडी सुटत असल्याने नाश्त्यामध्ये इडली, मेदूवडा, उपमा आणि चटणी, असे पदार्थ दिले जातात. महाराष्ट्रातील पदार्थांमध्ये सध्या केवळ कांदापोह्यांचा समावेश आहे. त्यामुळे मेनूमध्ये महाराष्ट्रातील आणखी पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत पुरणपोळीला विशेष स्थान आहे. सण-उत्सवांमध्ये आवर्जून बनविल्या जाणाऱ्या या पारंपरिक पदार्थाला राज्यभरात पसंती मिळते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासातही पुरणपोळी उपलब्ध करून देण्याचा आयआरसीटीसीचा विचार आहे. या पदार्थाचा समावेश झाल्यास प्रवाशांना प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेता येईल.
रेल्वे प्रवासात खाद्यपदार्थांच्या माध्यमातून विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख होते. त्यामुळे गाडीच्या मार्गावरील प्रदेश आणि प्रवाशांच्या खाद्यपसंतीनुसार मेनूमध्ये स्थानिक पदार्थांचा समावेश करण्याला महत्त्व आहे. मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपरमध्ये पुरणपोळीचा विचार हा महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यपदार्थांना रेल्वेच्या मेनूमध्ये स्थान देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.
...
मान्यतेनंतर यादीत बदल
पुरणपोळीचा समावेश करण्यासंदर्भात आयआरसीटीसीकडून सविस्तर प्रस्ताव तयार केला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येईल. बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतरच खाद्यपदार्थांच्या यादीत बदल करून पुरणपोळी उपलब्ध करून देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ४८ प्रश्नांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात काय घडलं? कपिल सिब्बल यांनी केली 'ही' मागणी

MPSC Group C Exam : एमपीएससी गट-क परीक्षार्थींना दिलासा; आरक्षणाचे दावे बदलता येणार, नव्याने अर्ज करण्याची गरज नाही

Encroachment Crime : गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर अतिक्रमणांवर कारवाई; अतिक्रमणमुक्त परिसर ठेवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक

Amravati Farmers : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; अमरावती जिल्ह्यात नमो निधीचे तीन हप्ते रखडले

Vande Bharat Sleeper : इडली-डोशानंतर आता वंदे भारतमध्ये पुरणपोळी! आयआरसीटीसीचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

SCROLL FOR NEXT