मुंबई

तीन दिवसांत मिळणार जन्म दाखला

CD

तीन दिवसांत मिळणार जन्म दाखला
जन्म नोंदणीचे पालिकेच्या रुग्णालयातच विकेंद्रीकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महापालिकेच्या चार प्रमुख आणि १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बालकांचा जन्म दाखला रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जन्माची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पालकांना जन्म प्रमाणपत्र मिळणार असल्याने जन्म दाखल्यासाठी रुग्णालयातून घरी गेल्यानंतर प्रशासकीय विभागाच्या कार्यालयात जाण्याची किंवा स्वतंत्रपणे पाठपुरावा करण्याची आवश्यकता राहणार नाही.

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेचे विकेंद्रीकरण केले आहे. याअंतर्गत महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरात घडणाऱ्या जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करण्याचे अधिकार संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत. यापूर्वी जन्म-मृत्यू नोंदणीसाठी प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांना स्वतंत्र अधिकार देण्याची मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली होती. राज्य शासनाने ही विनंती भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे पाठविली होती. भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांनी या प्रक्रियेला मंजुरी दिल्यानंतर रुग्णालय स्तरावरच जन्म-मृत्यू नोंदणी करणे शक्य झाले आहे. या सुविधेसाठी संबंधित रुग्णालयांना आवश्यक लॉग-इन आयडीदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, बाई य. ल. नायर रुग्णालय, लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि रुस्तमजी कूपर रुग्णालय या चार प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयासारख्या शासकीय रुग्णालयांमध्येही जन्म-मृत्यू नोंदणीची व्यवस्था लागू असलेल्या तरतुदींनुसार करण्यात येते.


नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदणीसारख्या महत्त्वाच्या सेवांसाठी विनाकारण प्रशासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद व्हावी, या उद्देशाने महापालिकेने जन्म-मृत्यू नोंदणीचे विकेंद्रीकरण केले आहे. त्यानुसार संबंधित रुग्णालयांना आवश्यक लॉग-इन आयडी देण्यात आले असून, रुग्णालयात जन्मलेल्या बालकांची नोंदणी तेथेच करण्यात येणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल.
- प्राजक्ता लवंगारे-वर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retaintion: स्टार्क, दीपक चाहर, ट्रॅव्हिस हेड बाहेर... १० संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज अन् रिटेन, पाहा संपूर्ण लिस्ट

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल खून खटल्याची सुनावणी चार डिसेंबरला

महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम बदलले! आता १२ वर्षांखालील मुलांना एकट्यानं प्रवेश बंद; सोसायट्यांची जबाबदारी वाढली

Paradh News : मोबाईल उघडल्या नंतरच महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या आत्महत्याचे कोढे उलगडणार.....? चार दिवसानंतर ही महाराजांच्या आत्महत्याचे गूढ कायम

Amravati News : नल-दमयंती सागर झाला अबोल! पक्षिमित्रांना लागली चिंता, दुष्काळाचे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT