मुंबई

सात वर्षानंतर रुग्णालयांत ३-टेस्ला एमआरआय

CD

सात वर्षांनंतर रुग्णालयांत ३-टेस्ला एमआरआय
आज उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक ३-टेस्ला एमआरआय मशीन उपलब्ध झाल्या आहेत. सुमारे सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सुविधेचे अखेर उद्‌घाटन होणार आहे. ‘सकाळ’ने गेल्या अनेक वर्षांपासून एमआरआय मशीनसाठी पाठपुरावा केला होता.
नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन जवळपास २०१८ पासून बंदच होती. त्यानंतर, केईएम रुग्णालयाची मशीनची समस्या ही कायम होती. दरम्यान, ११ वेळा फेरनिविदा प्रक्रिया राबविल्यानंतर या मशीन रुग्णालयात दाखल होऊन केईएम रुग्णालयामध्ये ही सेवा रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत झाली आहे. दररोज किमान २४ एमआरआय या नवीन मशीनने केले जातील.
सध्या नवीन मशीन आल्याने केईएम रुग्णालयात दोन, सायनमध्ये एकूण तीन आणि नायरमध्ये एक एमआरआय मशीनची संख्या झाली आहे, तर कूपर रुग्णालयातील पीपीपी तत्त्वावरील सेवा वगळता नवीन मशीन उपलब्ध झाल्याने पश्चिम उपनगरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

अत्याधुनिक सुविधा
३-टेस्ला तंत्रज्ञानामुळे शरीरातील विविध अवयवांच्या अधिक स्पष्ट आणि अचूक प्रतिमा मिळण्यास मदत होणार असून, गंभीर आजारांचे निदान अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. तसेच, एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना करावी लागणारी प्रतीक्षा कमी होईल. खासगी रुग्णालये आणि निदान केंद्रांमध्ये हजारो रुपये खर्चून करावी लागणारी ही तपासणी महापालिका रुग्णालयांमध्ये माफक दरात उपलब्ध होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lift Rules 2026 : १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही; राज्यात नवे कडक नियम लागू, उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द!

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Latest Marathi News Live Update : मोर्शी नगरपरिषदेतील 'ओल्या पार्टी' प्रकरणी मोठी कारवाई

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

SCROLL FOR NEXT