मुंबई

मणिपूरच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. थांगजम धवाली सिंग यांना ‘वन इंडिया अवॉर्ड २०२६’ प्रदान

CD

डॉ. थांगजम धवाली सिंग यांना
‘वन इंडिया अवॉर्ड’ प्रदान

मुंबई, ता. १८ : मणिपूरमध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. थांगजम धवाली सिंग यांना ‘माय होम इंडिया’च्या वतीने १७व्‍या ‘वन इंडिया अवॉर्ड २०२६’ने गाैरवण्यात आले. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १७) दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शशांक जोशी होते.

पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी डॉ. थांगजम यांच्या सामाजिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक कार्याचा आढावा घेणारा लघुपट दाखविण्यात आला. त्यानंतर डॉ. शशांक जोशी यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात आर्लेकर यांच्या हस्ते अन्य आठ मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत माय होम इंडियाचे अध्यक्ष सुनील देवधर यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. या वेळी माजी मंत्री भाई गिरकर उपस्थित हाेते. समाजासाठी कसे काम करावे, याचे ते आदर्श उदाहरण आहेत. मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे, अशा शब्दांत राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी डॉ. सिंग यांच्या प्रवासाचे कौतुक केले. डाॅ. थांगजम यांनी पुरस्काराबाबत आनंद व्‍यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप-शिवसेना कार्यालयांवर म्हाडाचा हातोडा; कारवाईवरून पदाधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Instagram Algorithm Update India : इन्स्टाग्रामवर आता अश्लील आणि हिंसक कंटेंट दिसणार नाही? मेटाचा भारतात मोठा निर्णय

Panchganga Sugar Factory : पंचगंगा शुगरकडून ३३०० रुपयांची पहिली उचल घोषित; टप्प्याटप्प्याने ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार; इतर कारखानदारांनी भूमिका न घेतल्याने शेतकरी आक्रमक

Latest Marathi News Live Update : वाघोली परिसरात चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नववा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT