मुंबई

एसी लोकलच्या मोटरमनला धक्का

CD

एसी लोकलच्या मोटरमनला धक्का

दिवा-मुंब्रादरम्यानची घटना; मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान एसी लोकलमध्ये मोटरमनला अचानक धक्का जाणवल्याने बुधवारी सकाळी रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. या प्रकारानंतर खबरदारी म्हणून ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा तातडीने बंद करून रुळांची तपासणी करण्यात आली. यामुळे गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. तपासणीनंतर मार्ग सुरक्षित असल्याचे घोषित करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली; मात्र दुपारपर्यंत लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने सुरू होती.

दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान सीएसएमटीच्या दिशेकडील मार्गावर किलोमीटर ४१/२१३ येथे बुधवारी सकाळी ८.१०च्या सुमारास के-२२ क्रमांकाच्या एसी लोकलच्या मोटरमनला धक्का जाणवला. त्याने तातडीने रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरातील ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून रेल्वे रुळांसह परिसराची तपासणी केली. या तपासणीत कोणतीही अनुचित बाब आढळली नाही. मार्ग सुरक्षित घोषित झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली, तरी फेऱ्यांचे वेळापत्रक सुरळीत होण्यास बराच वेळ लागला. विविध स्थानकांवर लोकलच्या विलंबाबाबत उद्‌घाेषणा करण्यात येत होत्या. त्यामुळे प्रवाशांना दिवसभर विलंबाचा सामना करावा लागला.

वेगमर्यादेसह वाहतूक सुरू
सकाळी पावणेनऊच्या सुमारास ताशी ५० किलोमीटर वेगमर्यादेसह लोकल वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर सव्वानऊच्या सुमारास संबंधित मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित घोषित करण्यात आला. त्यामुळे लोकल पूर्ण वेगाने चालवण्यास परवानगी देण्यात आली. या काळात रखडलेल्या फेऱ्यांमुळे वेळापत्रक विस्कळित झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप-शिवसेना कार्यालयांवर म्हाडाचा हातोडा; कारवाईवरून पदाधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Instagram Algorithm Update India : इन्स्टाग्रामवर आता अश्लील आणि हिंसक कंटेंट दिसणार नाही? मेटाचा भारतात मोठा निर्णय

Panchganga Sugar Factory : पंचगंगा शुगरकडून ३३०० रुपयांची पहिली उचल घोषित; टप्प्याटप्प्याने ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार; इतर कारखानदारांनी भूमिका न घेतल्याने शेतकरी आक्रमक

Latest Marathi News Live Update : वाघोली परिसरात चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नववा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT