मुंबई

आरेतील आरोग्य केंद्राचा खर्च पालिकेच्या माथी!

CD

आरेतील आरोग्य केंद्राचा
खर्च पालिकेच्या माथी!
सरकारचा ५० टक्के निधी घेण्यास नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहतीतील सरकारी जागेवर असलेले रुग्णालय मुंबई महापालिकेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून चालविण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या उभारणीचा संपूर्ण आर्थिक भार महापालिकेवर टाकण्यास विरोधकांनी आक्षेप घेतला. राज्य सरकारने बांधकाम खर्चातील ५० टक्के वाटा उचलावा, अशी मागणी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सुधार समितीच्या बैठकीत केली. सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर ही मागणी फेटाळून लावून मूळ प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे रुग्णालयाच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवरच राहणार आहे.

राज्य सरकारकडून सहा महिन्यांची नोटीस देऊन रुग्णालयाची जागा परत घेण्याची तरतूद असल्याबद्दलही वळवी यांनी आक्षेप घेतला. भविष्यातही या जागेचा वापर केवळ आरोग्यसेवांसाठीच व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिवसेनेचे (ठाकरे) सचिन पडवळ यांनी राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा कूचकामी ठरत असल्याची टीका केली. रुग्णालयाच्या उभारणीसाठी होणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के निधी राज्य सरकारकडून घ्यावा, अशी उपसूचना त्यांनी मांडली. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी बांधकाम खर्चातील निम्मा वाटा राज्य सरकारने उचलावा, अशी मागणी केली. दरम्यान, भाजपचे प्रकाश गंगाधरे यांनी या ठिकाणी प्रसूतिगृह सुरू करण्याची मागणी केली, तर राष्ट्रवादीचे अजित रावराणे यांनी आदिवासी पाड्यांतील नागरिकांना सर्पदंशासह अन्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्याची गरज अधोरेखित केली.
---
सुसज्ज रुग्णालय उभारा!
आरे आणि परिसरातील आदिवासीबहुल पाड्यांमधील नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज मोठे रुग्णालय उभारण्याची मागणी सदस्यांनी केली. शिवसेनेचे (ठाकरे) जितेंद्र वळवी यांनी आरे परिसरातील आदिवासी पाड्यांच्या जवळपास रुग्णालय नसल्याने नागरिकांना उपचारांसाठी दूर जावे लागत असल्याकडे लक्ष वेधले. प्रस्तावित रुग्णालयात अपघात विभाग, ट्रॉमा सेंटर तसेच सर्पदंशावरील उपचारांची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

Nagpur News : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कान्होलीबारातील शिक्षकाला अटक; सायबर पोलिसांची कारवाई, तीन दिवसाची पोलिस कोठडी

Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

Latest Marathi News Live Update : ओबीसी हॉस्टेल बांधण्यासाठी महसूल विभागाचा जागा देण्याचा निर्णय

MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

SCROLL FOR NEXT