मुंबई

मुंबईतील नऊ हॉटेलांचे परवाने निलंबित

CD

मुंबईतील नऊ हॉटेलांचे परवाने निलंबित
एफडीएची कारवाई; मियां कबाब, नॅचरल आईस्क्रीमचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : दक्षिण मुंबईतील नामांकित उपाहारगृहांमधील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. चेतना, कॅफे आयडियल, बायरूट, मियां कबाब्स, नॅचरल आईस्क्रीम यांसह नऊ नामांकित उपाहारगृहांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
एफडीएच्या पथकाने १७ नोव्हेंबरला केलेल्या तपासणीत या उपाहारगृहांत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळले. अन्न तयार करण्याच्या जागेतील अस्वच्छता, उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, कीटकांचा वावर, तसेच आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रांचा अभाव अशा त्रुटी निदर्शनास आल्या. कारवाई केलेल्या अन्य आस्थापनांमध्ये श्रीयोग रेस्टॉरंट, गुप्ता फ्रूट ज्यूस सेंटर, प्रकाश डोसा आणि सौरभ हॉटेल्सचाही समावेश आहे. या नऊ आस्थापनांचे परवाने अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत निलंबित करण्यात आले आहेत. निलंबनाच्या काळात या आस्थापनांना अन्नपदार्थांची खरेदी, विक्री किंवा वितरण करता येणार नाही. दरम्यान, बोरिवली पश्चिमेतील ओल्ड एमएचबी कॉलनी येथील गणेश पान बिडी शॉपमधून विक्रीसाठी ठेवलेला आठ हजार ७२८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---
ठाण्यातील तीन आस्थापनांवर कारवाई
ठाणे विभागातील ब्लिंक कॉमर्स, ब्रोड्यामा फूड्स आणि सागर स्वीट अँड बेकरी या तीन आस्थापनांचेही परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाणे मिळून एकूण १२ अन्न आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले! चौकात कवटी, रेल्वे पटरीलगत मृतदेह; दोन्ही अवयव एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय

Dengue-Like Infection : मुंढेत ४० जणांना डेंगीसदृश्य लागण; गावात खळबळ

Amravati Fire : वलगाव मार्गावरील हबीब नगर परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता; अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण

SCROLL FOR NEXT