मुंबई

चॅटजीपीटीच्या मदतीने बनावट एसी पास

CD

चॅटजीपीटीच्या मदतीने
बनावट एसी पास
तरुणाला अटक; मुदत संपलेल्या पासमध्ये फेरफार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनावट रेल्वे पास तयार करण्याचा प्रकार पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये उघडकीस आला आहे. मुदत संपलेल्या प्रथम श्रेणीच्या पासमध्ये चॅटजीपीटीच्या मदतीने फेरफार करून त्याचा वापर एसी लोकलच्या प्रवासासाठी करणाऱ्या अमन यादव या तरुणाला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तिकीट तपासनीसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील तिकीट तपासनीस प्रशांत साहू आणि अरविंद सिंग हे एसी लोकलमध्ये तपासणी करत असताना २ नोव्हेंबरला हा प्रकार उघड झाला. विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये रात्री वसई रोड स्थानकापूर्वी पाचव्या डब्यात अमन यादव प्रवास करताना आढळला. त्याच्याकडील पास तपासला असता त्याने मोबाईलवर रेलवन ॲपमधील पासचा स्क्रीनशॉट दाखविला.
अमनने दाखविलेल्या पासवर ३ ऑक्टोबर ते २ मार्च २०२६ अशी वैधता नमूद होती, मात्र पासमधील तपशील संशयास्पद वाटल्याने तिकीट तपासनीसांनी त्याला वसई रोड स्थानकात उतरवून कार्यालयात आणले. सुरुवातीला अमनने हा पास स्वतःचा असून, मित्राने रेलवन ॲपवरून काढून दिल्याचे सांगितले.
----
फेरफार केल्याची कबुली
पासवरील क्रमांक हँडहेल्ड टर्मिनल यंत्रणेत तपासला. त्या वेळी संबंधित क्रमांकाचा पास विरार ते बोरिवली मार्गावरील प्रथम श्रेणीचा असल्याचे स्पष्ट झाले. या पासची मूळ वैधता ३ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंतच असल्याचे उघड झाले. चौकशीदरम्यान अमनने मुदत संपलेल्या पासमध्ये चॅटजीपीटीच्या मदतीने फेरफार करून बनावट पास तयार केल्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले! चौकात कवटी, रेल्वे पटरीलगत मृतदेह; दोन्ही अवयव एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय

Dengue-Like Infection : मुंढेत ४० जणांना डेंगीसदृश्य लागण; गावात खळबळ

Amravati Fire : वलगाव मार्गावरील हबीब नगर परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता; अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण

SCROLL FOR NEXT