मुरूड, ता. २५ (बातमीदार) : शहीद दिनानिमित्त क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना मुरूडकरांनी गुरुवारी (ता. २३) अभिवादन केले. शहरातील जुनी पेठ येथील मोहन करंदेकर यांच्या निवासस्थानी मुरूडकरांनी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन करून विनम्र श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच मोहन करंदेकर हे सतत ४१ वर्षे अतिशय श्रद्धेने व निष्ठेने शहीद दिन साजरा करत आहेत. स्वातंत्र्याच्या बलीवेदीवर हसत हसत फासावर गेलेल्या हुताम्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हे कार्यक्रमातून व्यक्त करत असतात. या वेळी मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उद्योजक शैलेश देशपांडे, वासंती उमरोटकर, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांनी शहिदांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.