mva mva
मुंबई

Mumbai : आगामी निवडणुकीत मविआ कायम राहणार; मधुकर पाटील

आगामी काळात निवडणूक आघाडी कायम असून, प्रयत्नांची शिकस्त करून आम्ही मोठे यश संपादित करू, असा विश्वासही मधुकर पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

मुरूड - आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व शेकाप ही आघाडी कायम राहणार आहे. सर्व निवडणुकांमध्ये आम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे. शेकाप हा आमच्या सोबतच राहणार असून, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही, असे स्पष्ट करत विनाकरण अफवा पसरून गैरसमज पसरवण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील सांगितले.

आगामी काळात निवडणूक आघाडी कायम असून, प्रयत्नांची शिकस्त करून आम्ही मोठे यश संपादित करू, असा विश्वासही मधुकर पाटील यांनी व्यक्त केला. मुरूड येथील वाणदे येथे एका कार्यक्रमात आले असता पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. वाणदे येथील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्वार समारंभ व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले होते.

या वेळी ग्रामस्थ मंडळी वाणदेतर्फे मधुकर पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्‍छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी तुकाराम पाटील, किशोर धामणसकर, श्रीकांत वारगे आदी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले,

रायगड जिल्ह्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन पक्षांच्या आघाडीनेच बाजी मारली आहे. सर्वाधिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमचे वर्चस्व असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार सुनील तटकरे यांचे विकासकामे रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आहेत. जनतेचा विश्वास हा आघाडीवर असून, निवडणुकांमध्ये आम्हाला निश्चित यश मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Atpadi news : शिवसेनेचे तृतीयपंथी पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू, सांगलीच्या आटपाडीमधील घटना

Thane News: ठाण्यातील वनजमिनीवरील पाच दशकांचा शासनाचा दावा फेटाळला, राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

अमिताभ नाहीतर 'या' व्यक्तीवर होतं जया बच्चन यांचं पहिलं प्रेम, म्हणालेल्या...'ते मला देवासारखे वाटतात'

Pune Dust Pollution: पुणे पिंपरीत डंपर मिक्सरचा ‘धूळकंठ’; अवजड वाहनांमुळे वायू, धूळ आणि ध्वनी प्रदूषण वाढले

SCROLL FOR NEXT