मुंबई

खारआंबोलीत भक्तीचा जागर

CD

मुरूड (बातमीदार)ः खारआंबोलीतील जय हनुमान मंदिरात शतकोत्तर महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्‍या या गावाची लोकसंख्या १५०० च्या आसपास आहे. दोन दिवस चाललेल्‍या महोत्‍सवात मुंबईत स्थायिक झालेले चाकरमानीही मोठ्‌या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रतिष्ठित नागरिक, समाज अध्यक्ष तसेच मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. काकड आरती, श्री गणेश पूजन, पुण्यहवाचन, मारुती याग, अभिषेक, दिंडी प्रदक्षिणा-पालखी आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन भालचंद्र जोशी यांच्या पौरोहित्‍याखाली करण्यात आले होते. महोत्‍सवात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. महोत्सवात स्थानिक आमदार महेंद्र दळवी तसेच सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख, पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. महोत्सवाचा समारोप देहू येथील पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तनाने झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

SCROLL FOR NEXT