मुंबई

जनजागृतीमुळे व्यसनाधिनता कमी होईल

CD

मुरूड, ता. ११ (बातमीदार) : अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली पिढी व्यसनाच्या गर्तेतून बाहेर यावी, यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. अशा जनजागृतीमुळेच व्यसनाधिनता कमी होवून समाज व्यसनमुक्त घडेल, असा विश्वास मुरूड पोलिस उपनिरीक्षक नितिन मंडलिक यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड पोलिस ठाणे अंतर्गत नशामुक्त भारत रॅली कार्यक्रमावेळी आपले विचार व्यक्त करत होते. या वेळी नशा करू नका! नशेत गाडी चालू नका! आपले जीव लाख मोलाचे, कुटुंबाला सांभाळा! या संदर्भातले पत्रके व स्टिकर रिक्षाचालकांना आणि नागरिकांना वाटप करण्यात आले. रिक्षाचालकांनी स्टीकर लावून जनजागृती फेरी काढली. या वेळी पोलिस उपनिरीक्षक नितीन मंडलिक, पोलिस नाईक परेश म्हात्रे, पोलिस नाईक सुरेश वाघमारे, पोलिस शिपाई सागर रसाळ, रिक्षा चालक-मालक संघटनाचे अध्यक्ष मुज्जफर सुर्वे, वाहतूक पोलिस हवालदार संतोष गायकवाड, माजी अध्यक्ष रिक्षाचालक-मालक संघटना अस्लम शेख, सारिक सुर्वे, मुकेश दांडेकर, इम्रान काजी आदींसह होमगार्ड व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : पशुवैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. पुन्नियमूर्ती नटेशन यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT