मुंबई

विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

CD

मुरूड, ता. ११ (बातमीदार) : भाच्याला पोहायला शिकवताना मामाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुरूडनजीकच्या विहूर गावात घडली आहे. नदीम पांगारकर (वय २७) असे विहिरीत बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुरूड पोलिस ठाणे हद्दीतील विहूर गावात नदीम पांगारकर हा मंगळवारी आपल्या घरामागे असणाऱ्या विहिरीमध्ये भाचा शाजेब इम्रान कारभारी (वय १७) याला पोहायला शिकवत होता. त्या वेळी अचानक त्याला श्वाच्छोछ्श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे दमछाक होऊन तो विहिरीत बुडाला. ही घटना परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी तातडीने भाच्याला बाहेर काढले. शाजेबच्या मदतीला शेजारी धावून आल्याने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले. शाजेबला अलिबाग जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मुरूड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT