मुंबई

Crime News: अवैध मासेमारी करणाऱ्या १० बोटी ताब्‍यात

मुरूड येथील तटरक्षक दलाने कारवाई करून त्‍या ताब्‍यात घेतल्‍या| मुरूड येथील तटरक्षक दलाने कारवाई करून त्‍या ताब्‍यात घेतल्‍या

CD

Crime News: बंदी असूनही अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर गावातील काही मच्छीमार एलईडी व पर्सनेट मासेमारी करतात. मुरूड येथील तटरक्षक दलाने कारवाई करून त्‍या ताब्‍यात घेतल्‍या. (sea crime )

खोल समुद्रात टेहळणी करताना तटरक्षक दलाला काही बोटी आढळल्‍या. यात चार एलईडी बोटी तर सहा पर्सनेट जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींचा समावेश असल्‍याची माहिती मुरूड पोलिसांनी दिली. (murud Crime)

पकडलेल्‍या १० बोटीआगरदांडा बंदरात आणल्या असून बोटींवर मासेमारी करणाऱ्यांचे साहित्‍य, इतर सामुग्रीचे पंचनामे करण्यात आले आहेत. बोटीवर काम करणाऱ्या सर्व मच्छीमारांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.


काही दिवसांपूर्वी एकदरा परिसरात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आक्षी-साखर येथील एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटीतील मच्छीमारांनी मारहाण केली होती. यावेळी मुरूड तालुक्यातील मच्छीमारांनी एकत्र येत मोर्चा काढून त्यांच्यावर कार्यवाही करण्यास भाग पाडले होते.


ही घटना ताजी असताना आता तटरक्षक दलाने टेहळणी करताना, नानवेल दीपगृहासमोर असणाऱ्या समुद्रातून या बोटी पकडल्‍या आहेत. बोटींवर कारवाई केल्‍याने मुरूड तालुक्यातील स्‍थानिक मच्छीमारांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना मुबलक मासे मिळत असल्‍याने पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्‍यामुळे तटरक्षक दलाकडून नियमित कारवाई झाल्‍यास एलईडी, पर्सनेट मासेमारीला आळा बसेल, अशी मागणी स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.

खोल समुद्रात एलईडी, पर्सनेट पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दहा बोटींवरील १०३ खलाशांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम पुढेही सुरूच ठेवणार आहे.


- तुषार वाळुंज, परवाना अधिकारी, मत्स्यविकास मुरूड

काही मत्‍स्‍य प्रजाती नष्‍ट


बंदी असतानाही रायगड जिल्ह्यात विशेषतः मुरूड, उरण समुद्रात पर्सनेट मासेमारी होते. याबाबत अनेकदा मत्स्यविभागाला माहिती असते, मात्र कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्‍याने स्‍थानिक मच्छीमार सांगतात. बेकायदा मासेमारीमुळे अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे तारली, दाढा, सफेद कोलंबी, नल, तेल बांगडा यांसारख्या मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT