मुंबई

कोर्लईत रताळ्यांची शेकडो टन विक्री

CD

मुरूड, ता. २५ (बातमीदार) ः महाशिवरात्रीनिमित्त अनेक शिवभक्‍त उपवास, व्रत वैकल्ये करतात. उपवासाला रताळ्यांना मागणी असल्‍याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येतात. तीन-चार दिवसांपासून मुरूड बाजारपेठेत शेकडो टन रताळ्यांची उलाढाल सुरू आहे.
कोकण किनारपट्टीवर पोर्तुगिजांचे वंशज आजही मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात निवास करून आहेत. सुमारे २,००० लोकसंख्या असलेला हा समाज पारंपरिक पद्धतीने भाजीपाला, वांगी, पडवळ तसेच चिबूडचे मोठ्या प्रमाणावर उत्‍पादन घेत असून त्‍यावरच त्‍यांचा उदरनिर्वाह चालतो. महाशिवरात्रीनिमित्त लागवड केलेली रताळी आता तयार झाली असून बाजारात विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. गावठी वाण असलेली व चविष्ट असल्‍याने ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
रताळी हे पीक साधारण अडीच महिन्यांत तयार होते. यंदा नोव्हेंबरपर्यंत अवकाळीने धुमाकूळ घातल्‍याने तुलनेने उत्‍पादन कमी झाल्‍याचे कोर्लईच्या महिला विक्रेत्या लिबान वेगस यांनी सांगितले.
सध्या बाजारात ५० ते ६० महिला विक्रेत्यांनी प्रत्‍येकी सात ते आठ क्‍विंटल रताळी विक्रीसाठी आणली आहेत. दर्जानुसार मोठ्या रताळ्यांचा प्रती किलो भाव १०० रुपये, मध्यम आकारातील रताळी ८० रुपये तर लहान रताळी ६० रुपये किलोने विक्री होत असल्‍याचे ७२ वर्षीय शेतकरी कुस्सात वेगस यांनी सांगितले.

नगरपालिकेकडून विक्रेत्‍यांसाठी सुविधा
मुरूडच्या रताळी बाजाराला शंभर वर्षांहून अधिक परंपरा असून कोर्लईच्या समाजाने आजही ती अबाधित ठेवली आहे. विक्रेत्‍यांसाठी मुरूड नगर परिषदेतर्फे दरवर्षी लाइटिंगसह मंडप उभारणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या दबावात निर्णय: प्रकाश आंबेडकर;संघ मुख्यालयावर मोर्चाची केली घोषणा

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT