सवित्रीच्या लेकींना ३०० सायकलची भेट
मुरूड, ता. १० (बातमीदार) ः श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंत नगर व उसरोलीतील अंजुमन इस्लाम विद्यालयातील इयत्ता सातवी ते दहावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींना तीनशे सायकलींचे बुधवारी वाटप करण्यात आले. वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे व खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींना ही मदत करण्यात आली. या वेळी मुरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष फैरोज घलटे, अलिबाग मुरूड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमित नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडीक, रायगड जिल्हा सोशल मिडिया सेलचे उपाध्यक्ष हसमुख जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज भगत, माजी सरपंच अजित कासार आदी उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविकपर भाषणात फैरोज घलटे यांनी सांगितले की, नांदगाव विद्यालयातील तीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी सुरुवातीला २५ लाख व आता १० लाख रुपयांचा निधी खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे. वरदा तटकरे यांचा वाढदिवस १५ एप्रिल रोजी असून त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राऊत यांनी तर आभार योगेश पाटील यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.