मुंबई

वीजचोरी प्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

CD

मुरूड, ता. २४ (बातमीदार) ः कल्याण भरारी पथक व मुरूड महावितरणतर्फे बाजारपेठेतील व्यापारी दिलीप जैन यांच्या मालकीच्या फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स महावीर शॉपसह घरातील वीजमीटरची तपासणी केली असता त्‍यात फेरफार केल्याचे उघड झाले आहे.
मुरूडमधील महावितरणचे प्रभारी सहाय्यक अभियंता सतीश खरात यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप डालू व उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण भरारी पथकातील कर्मचारी व मुरूड महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे मुरूड बाजारपेठेतील दुकान व घरगुती मीटरची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान जैन यांच्या मालकीचे फर्निचरचे दुकान व दुमजली घरामध्ये अनधिकृत वीजजोडणी केल्‍याचे आढळले. प्रत्यक्ष वीजमीटर तपासणी केली असता, त्‍यात फेरफार करून वीजचोरी करीत असल्याचे आढळले. दुकानातील वीजचोरीप्रकरणी सुमारे एक लाख ९५ हजार व घरातील वीजचोरीप्रकरणी सुमारे सहा लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

दंडात्‍मक कारवाई
मुरूड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी वीजचोरी करू नये. दिलीप जैन यांनी दोन्ही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. त्‍यांना दंड करण्यात आला आहे. महावितरणचे कार्यक्षेत्र माणगाव असल्याने तिथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासासाठी मुरूड पोलिस ठाण्यात वर्ग होणार असल्याची माहिती मुरूड महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT