मुंबई

किडनीचे विकार होऊ नयेत म्हणून पुरेसे पाणी पिणे गरजेचे

CD

किडनीचे विकार होऊ नयेत म्हणून पुरेसे पाणी पिणे गरजेचे
पदमश्री डॉ. लहाने यांचा मौलिक आरोग्य सल्ला!
मुरुड, ता. १ (बातमीदार) ः धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलत असून, किडनीचे वाढते विकार ही चिंतेची बाब ठरत आहे. किडनीचे विकार होऊ नयेत म्हणून रोज प्रत्येकाने तीन ते चार लिटर पाणी पिणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. मुरूड येथील संजीवनी आरोग्यसेवा संस्था संचालित अंजना बाई पुंडलीकराव लहाने हेल्थ अँड वेलफेअर सेंटर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डिजिटल क्ष-किरण कक्षाचे उद्‌घाटन करताना डॉ. लहाने बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी पाच ते सहा वर्षांमध्ये संजीवनी संस्थेला अनेक दात्यांनी भरभरून अर्थसहाय्य केल्यामुळे तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच देणगीदार व सेवाभावी सहकारी कार्यकर्त्यांच्या भरीव योगदानामुळे डायलिसिस सेंटरसोबत अन्य वैद्यकीय सुविधा आपण देऊ शकलो त्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. या वेळी सुनील मोहिले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्थेला देणगी कार्यकर्त्यांच्या समर्पित वृत्तीमुळे मिळते. माझ्या कुटुंबातील शोभा फडणीस, शामला राजे, निता मथुरे या भगिनींच्या दातृत्वामुळे डिजिटल एक्स-रे मशीन सुपूर्द करताना विशेष आत्मिक समाधान वाटत असल्याचे सांगितले. या वेळी उन्नती हॉस्पिटलच्या युनिट तर्फे शिबिरातील मुतखडा, मूत्रपिंड, पौरुष ग्रंथी आदी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वीतेसाठी आदेश दांडेकर, प्रमोद भायदे, मंगेश दांडेकर, राशीद फहीम, किर्ती शहा, नितीन अंबुर्ले, उल्हास मकू, जयश्री प्रधान, दक्षता चोगले, प्रतीक पानकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती उमरोटकर यांनी तर आभार प्रदर्शन अजित गुरव यांनी केले. या वेळी नेत्र चिकित्सातज्ज्ञ‍ डॉ. रागिणी पारेख, विभागप्रमुख डॉ. मकबुल कोकाटे, डॉ. प्रवीण बागुल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चौले, कार्याध्यक्ष विजय सुर्वे, समाजसेवक सुनील मोहिले, प्रतिभा मोहिले, डॉ. समाधान पाटील, डॉ. पांडुरंग वरक, उन्नती हॉस्पिटलचे डॉ. श्रीकांत शिंदे, जावीद घरटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
..................
प्रोटीन्सयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. लहाने म्हणाले की, किडनीचा मी स्वतः रुग्ण असून, आईने दिलेल्या एका किडनीवर गेली ३० वर्षे कार्यरत आहे. तथापि किडनीचे आजार होऊ नयेत म्हणून चॉकलेट, कॅल्शिअम व प्रोटीन्सयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. तसेच मांसाहारी व मिठाचे पदार्थ तसेच बेकरी प्रॉडक्ट्स आरोग्यास हानिकारक असल्याने जिभेवर नियंत्रण ठेवून ते टाळावेत. गोड फळे, साखर, गूळ हे पदार्थ मधुमेही रुग्णांनी न खाण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मासे तळून न खाता भाजून खावेत, असा मौलिक आरोग्य सल्ला त्यांनी दिला. संजीवनी आरोग्य संस्थेला मोहिले आणि परिवाराने क्ष-किरण मशिन देऊन उपकृत केल्या बद्दल त्यांचे जाहीर आभार मानले. आपत्‍कालीन स्थितीत मोबाईल क्ष-किरण मशीन देखिल उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT