कचऱ्यातून निर्माण केला पर्यावरणपूरक मार्ग
अजिंक्य धारियाची सॅनिटरी पॅड रिसायकलिंगमध्ये जागतिक कामगिरी
म्हसळा, ता. २८ (बातमीदार) : म्हसळा तालुक्यातील अजिंक्य धारिया याने सॅनिटरी पॅड्सच्या विल्हेवाटीच्या गंभीर समस्येवर तांत्रिक उपाय शोधत जागतिक स्तरावर आपले नाव उज्ज्वल केले आहे.
अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना पुण्यातील कचरा डेपोला दिलेल्या भेटीत त्याने उघड्या हाताने वापरलेले पॅड्स गोळा करणाऱ्या सफाई कामगार महिलेला पाहिले आणि याच क्षणापासून सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करण्याचा निर्धार केला. त्यातून ‘पॅडकेअर लॅब्स’ची स्थापना करत सॅनिटरी पॅड्स सुरक्षितपणे रिसायकल करणारे ‘पॅडकेअर एक्स’ मशीन विकसित करण्यात आले. या तंत्रज्ञानाद्वारे पुनर्वापरातून उपयुक्त वस्तू तयार होत असून पर्यावरण संरक्षणासोबत महिलांच्या आरोग्याचा प्रश्नही हाताळला जात आहे. त्याच्या या उपक्रमाला देश-विदेशातून मोठी दाद मिळत आहे.
चौकट
सॅनिटरी कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी उपाय
भारतामध्ये दरवर्षी कोट्यवधी सॅनिटरी पॅड्स कचऱ्यात टाकले जातात व त्यांना विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. अजिंक्यच्या तंत्रज्ञानामुळे हा कचरा सुरक्षितरीत्या रिसायकल होत असून पर्यावरण, सफाई कामगारांचे आरोग्य आणि कचरा व्यवस्थापन या तिन्ही स्तरांवर मोठा सकारात्मक परिणाम होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.