मुंबई

म्हसळा तालुक्यात होळी उत्सव उत्साहात

CD

म्हसळा तालुक्यात होळी उत्सव उत्साहात
पारंपरिक ‘गोमूचे नाच’ जपणाऱ्या गावांचे सांस्कृतिक दर्शन
म्हसळा , ता. १ (बातमीदार) : हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेला होळी उत्सव तालुक्यात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून शिमगा सणाने परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या होळीच्या नऊ दिवस आधीपासून ‘पिलू लावणे’ या प्रथेने उत्सवाला सुरुवात होते. पूर्वी तालुक्यातील सुमारे ८४ गावांपैकी ५० ते ५५ गावांमधून विविध खेळी व नाच सादर करत कलाकार म्हसळा शहरात दाखल होत असत. यानिमित्त खास होळी बाजारही भरत असे.
कालांतराने बदलत्या जीवनशैलीमुळे काही ठिकाणी ही परंपरा कमी होत असली तरी केलटे, दुर्गवाडी, आगरवाडा, कांदळवाडा, निगडी, वाशी, सुरई, खारगाव, सकलप, पाष्टी, घूम, नेवरूळ, आदिवासी वाडी, जांभूळ, चिरगाव आणि घोणशे आदी गावांनी गोमूचे नाच जिवंत ठेवले आहेत. हे नृत्य पाहण्यासाठी म्हसळ्यात मोठी गर्दी होत आहे.
आम्ही गावोगावी जाऊन भगवंताची गीते गात थेर बोरकी नाच सादर करतो. भाऊ-बहिणीच्या नात्याचे जिवंत चित्र यातून उभे करतो. ही परंपरा अनेक शतकांपासून जपत आहोत, असे महेश पवार (केलटे) यांनी सांगितले.

फोटो-म्हसळा तालुक्यातील केलटे गावातील होळीच्या खेळात सहभागी झालेले केलटे येथील ग्रामस्थ. (छाया -उदय कळस )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT