श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे म्हसळ्यात स्वागत
म्हसळा, ता. ८ (बातमीदार) ः अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे म्हसळा शहरात भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात भव्य स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, फुलांची उधळण करीत आणि ‘श्री स्वामी समर्थ’च्या जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. एसटी स्थानकापासून ते श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी पालखी व मूळ पादुकांचे दर्शन घेतले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व मूळ पादुकांचे विविध गावांमध्ये आगमन व परिक्रमा आयोजित केली जाते. ही पालखी महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक राज्यांत सुमारे दहा हजार किलोमीटरचा प्रवास करत भाविकांना दर्शन देते. म्हसळा शहरात ही पालखी आणण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज मंडळ, म्हसळा यांनी विशेष प्रयत्न केले. पालखी आगमनाच्या वेळी शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
मंडळाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी चहा, पाणी आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पालखी सोहळ्याचे नियोजनही मंडळाने अत्यंत उत्तमप्रकारे केले होते.
फोटो ः म्हसळा शहरात अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पालखीचे दर्शन घेताना भक्तगण. (छाया ः उदय कळस)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.