म्हसळ्यात हॉटेल व्यावसायिकांवर संक्रांत
व्यावसायिक गॅस सिलिंडर बंद
म्हसळा, ता. १४ (बातमीदार) : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने म्हसळा तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील छोटे-मोठे हॉटेल, खानावळी, चहाच्या टपऱ्या आणि नाश्त्याचे स्टॉल चालवणाऱ्या व्यावसायिकांचे यामुळे कंबरडे मोडले आहे. परिणामी काही ठिकाणी हॉटेलचे कामकाज मर्यादित ठेवावे लागत असून परिस्थिती अशीच राहिल्यास व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील पर्यटकांना व बाहेर राहणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणासाठी हॉटेलवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे हॉटेल बंद किंवा सेवा कमी झाल्यास ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावरही परिणाम जाणवत असल्याचे वितरकांकडून सांगण्यात येत आहे. गॅस सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर पूर्वी साधारण २५ दिवसांत सिलिंडर मिळत होता. मात्र, आता हा कालावधी वाढून सुमारे २८ दिवसांपर्यंत गेला आहे. तसेच, दोन सिलिंडर कनेक्शन असलेल्या ग्राहकांना दुसरा सिलिंडर मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास तो स्वीकारला जात नसल्याची तक्रारही ग्राहकांकडून केली जात आहे. यामुळे आधीच महागाईने हैराण झालेल्या नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली असून गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.