मुंबई

म्हसळा शहर की ग्रामीण? गॅस नोंदणीतील तांत्रिक घोळामुळे नागरिक हैराण; सुनील तटकरेंनी घेतला पुढाकार.

CD

गॅस नोंदणीतील तांत्रिक घोळ
नगरपंचायत असूनही कंपनीच्या रेकॉर्डवर ग्रामीण नोंद ः नागरिक हैराण
म्हसळा, ता. २१ (बातमीदार) ः गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच नोंदणीतील तांत्रिक घोळामुळे त्यात आणखी बर पडली आहे. म्हसळा शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळूनही गॅस वितरण कंपनीच्या तांत्रिक प्रणालीमध्ये हे शहर अजूनही ग्रामीण म्हणूनच नोंदवले गेले आहे. यामुळे म्हसळकरांना गॅस सिलिंडरसाठी तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे सध्या देशात गॅस सिलिंडरचा काहीसा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत नियमांनुसार, शहरी आणि ग्रामीण भागासाठी सिलिंडर बुकिंगच्या कालावधीत मोठी तफावत आहे. यामुळे म्हसळा ही नगरपंचायत असतानाही गॅस कंपनीच्या रेकॉर्डवर ती ग्रामीण दिसत असल्याने, येथील ग्राहकांना दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी दीड महिना वाट पाहावी लागत आहे. यामुळे शहरातील गृहिणींचे आर्थिक गणित आणि स्वयंपाकाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे म्हसळावासियांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेत कंपनीला चूक सुधारण्याचे निर्देश दिले आहेत. ही तांत्रिक दुरुस्ती झाल्यास म्हसळकरांना आता २५ दिवसांत सिलिंडर बुकिंगची सुविधा उपलब्ध होईल.

तांत्रिक अडचण
शहरी भाग: नवीन सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांचा कालावधी अनिवार्य आहे.
ग्रामीण भाग: नवीन सिलिंडर बुकिंगसाठी तब्बल ४५ दिवसांचा कालावधी अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : सिनेमागृहात कर्मचाऱ्याने चाकूचा धाक दाखवून दिली धमकी

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT