मुंबई

डॉ. दिलीप जगदाळे यांची मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती

CD

डॉ. दिलीप जगदाळे यांची मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात महत्त्वाची जबाबदारी; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव
म्हसळा, ता. १० (बातमीदार) : राज्य प्रशासनातील अभ्यासू व कर्तबगार अधिकारी म्हणून ओळख असलेल्या डॉ. दिलीप जगदाळे यांची मंत्रालय, मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे राज्यभरातून स्वागत होत आहे.
डॉ. जगदाळे यांनी यापूर्वी महाडिस्कॉम, कल्याण येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. महसूल विभागात कोकण, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांवर काम करत त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची छाप पाडली.
नवीन पदावर त्यांच्यावर जलजीवन मिशन, ‘प्रत्येक घर नळ’ योजना, निधी वितरण तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओडीएफ प्लस मोहिमेची अंमलबजावणी यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा व खालापूर येथून कारकीर्द सुरू केलेल्या डॉ. जगदाळे यांच्या अनुभवाचा राज्याच्या विकासाला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT