पाष्टीतील विहीर कोसळण्याच्या मार्गावर
दोन वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; नवीन विहिरीची मागणी
म्हसळा, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यातील मांदाटणे ग्रामपंचायत हद्दीतील पाष्टी कुणबीवाडी आणि पाष्टी बौद्धवाडी या दोन वाड्यांना पाणीपुरवठा करणारी एकमेव सार्वजनिक विहीर धोकादायक अवस्थेत आहे. विहिरीचा खालचा भाग कोसळून पाण्यात पडल्याने पाणी गढूळ झाले आहे. पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना नाइलाजाने याच दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नवीन विहीर बांधण्याची मागणी जोर धरत आहे.
दोन्ही वाड्यांतील नागरिकांसाठी ही विहीर पाण्याचा एकमेव आधार आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी डागडुजी करून विहीर वापरात ठेवली होती, मात्र आता विहिरीचा खालचा भाग अचानक कोसळून पाण्यात पडला आहे. विहिरीचा उर्वरित भागही दररोज हळूहळू ढासळत असल्याने पाणी अधिक गढूळ होत आहे. विहिरीची अवस्था पाहता ती कधीही पूर्णपणे कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांनी विहिरीची पाहणी केली असून, नवीन विहीर बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे, मात्र मंजुरी आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब झाल्यास ग्रामस्थांची पाण्यासाठीची अडचण कायम राहणार आहे.
स्वच्छ पाण्याची व्यवस्था करा
विहिरीची दुरवस्था लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पर्यायी स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच नवीन सार्वजनिक विहिरीच्या बांधकामाला मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांनी केली आहे.
सोबत फोटो आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.