मुंबई

वीज चोरांविरुद्ध महावितरणचा दणका

CD

मनोर, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात वीजचोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ९७१ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आल्या आहेत. वीज मीटरमध्ये फेरफार, आकडे आणि सर्व्हिस वायर बायपास करून सुमारे ७०.५ लाख युनिट विजेच्या अनधिकृत वापर झाला आहे. एक कोटी ६५ लाख ४२ हजारांची दंडात्मक आकारणीची बिले संबंधितांना दिली आहेत. त्यापैकी ४८५ ग्राहकांनी बिलांचा भरणा केला असून, महावितरणच्या खात्यात एक कोटी ७० हजार रुपये जमा झाले आहेत. दुसरीकडे, १४६ जणांविरुद्ध वीजचोरीप्रकरणी गुन्हे दाखल असून, उर्वरित प्रकरणांतील देयकवसुलीचे आव्हान महावितरणसमोर कायम आहे.

वीजचोरीमुळे महावितरणच्या महसुलावर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील १० उपविभागांत तपासणी मोहिमा तीव्र करण्यात आल्या आहेत. वीजचोरी रोखण्यासाठी अभियंते आणि कर्मचाऱ्यांना कारवायांची संख्या वाढविण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून दिले जात आहेत. त्यानुसार वीजचोरी शोधणाऱ्या पथकांनी तपासणीच्या वेळापत्रकात बदल केला असून, पहाटे तसेच रात्रीच्या वेळीही धडक तपासण्या केल्या जात आहेत.

तलासरीत सर्वाधिक वीजचोरी
तलासरी उपविभागात सर्वाधिक २२७ ठिकाणी वीजचोरी आढळली आहे. त्याखालोखाल पालघर पूर्व उपविभागात १६९, डहाणूमध्ये १४४, बोईसर ग्रामीणमध्ये १२७, तर विक्रमगड उपविभागात ११७ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली आहे. पालघर पश्चिम उपविभागात ६०, मोखाड्यात ४०, सफाळेमध्ये ३८, जव्हारमध्ये ३३, तर एमआयडीसी उपविभागात १६ ठिकाणी वीजचोरी आढळून आली आहे.

साडेचारशेहून अधिक प्रकरणे वसुलीच्या प्रतीक्षेत
वीजचोरीच्या प्रकरणांत महावितरणने दंडात्मक आकारणी केली असली, तरी सर्व ग्राहकांकडून बिलांचा भरणा झालेला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार ४८५ ग्राहकांनी बिलांची रक्कम भरली आहे. गुन्हे दाखल झालेल्या ग्राहकांकडून वीजचोरीच्या बिलांपोटी आणखी २१ लाख ८३ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. याशिवाय, वीजचोरीच्या बिलवसुलीची ३४० प्रकरणे प्रलंबित असून, या प्रकरणांतून ४३ लाख ५० हजारांची वसुली अपेक्षित आहे.

५५ टक्के ग्राहकांकडे स्मार्ट मीटर
पालघर जिल्ह्यातील महावितरणच्या १० उपविभागांत मिळून सुमारे चार लाख ६५ हजार वीजग्राहक आहेत. यापैकी ५५ टक्के ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजवापराची नोंद आणि त्यावर देखरेख ठेवण्याच्या प्रक्रियेला मदत होण्याची अपेक्षा आहे.

उपविभाग कारवाई वीजचोरीपोटी दंड
पालघर पूर्व १६९ ५१,४८,१९३
डहाणू १४४ २९,४४,८२०
बोईसर ग्रामीण १२७ २६,४६,६५०
तलासरीत २२७ १०,२५,२२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

Caller ID: आता अनोळखी कॉल्सचा खेळ खल्लास; Jio, Airtel, Vi ग्राहकांसाठी मोठा निर्णय, १ नोव्हेंबरपासून...

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT